‘जैविक’ने धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:20+5:302021-02-05T08:26:20+5:30
दारू विक्री बंद करा आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार ...

‘जैविक’ने धोका
दारू विक्री बंद करा
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण भागातील महिलांसह नागरिकांनी दारुबंदीची मागणी केली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
श्वानांना आवर घाला
बीड : शहरातील अनेक भागात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. हे भटके श्वान टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.
सिग्नल सुरू करा
बीड : शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे अनेक वेळा वाहनधारक, नागरिकांतून सुरू करण्याची मागणी होती; परंतु याची दुरुस्ती झालेली नाही.
बस सुरू करा
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अॅपे, रिक्षा या अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे.