शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मोठी बातमी: वाल्मीक कराडच्या पत्नीसह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाची CID कडून कसून चौकशी

By सोमनाथ खताळ | Updated: December 27, 2024 22:29 IST

सीआयडीकडून तपास : जिल्हाध्यक्षांना लातूरवरून पोलिस वाहनातून आणले बीडला.

बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवणचक्कीचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याला दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची पत्नी मंजीली कराड व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सीआयडीने शुक्रवारी साडे नऊवाजेपर्यंत चौकशी केली. जिल्हाध्यक्ष चव्हाण यांना तर लातूरहून पोलिस वाहनातून बीडला आणण्यात आले होते. त्यांना आता शनिवारी पुन्हा हजर राहण्याची नोटीस दिल्याची माहिती आहे.

केज तालुक्यात पवणचक्की उभारणीचे काम करणाऱ्या अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या सुनिल केदु शिंदे (वय ४२ रा.नाशिक ह.मु.बीड) यांना दोन काेटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ११ डिसेंबर रोजी वाल्मीक कराड (रा. परळी), विष्णु चाटे (रा. कौडगाव ता. केज) व सुदर्शन घुले (रा. टाकळी ता. केज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सध्या सीआयडी करत आहे. सध्या केवळ विष्णू चाटे हा एकमेव आरोपी अटक असून त्याला शुक्रवारी न्यायालयाने ११ दिवसांची वाढीव पोलिस कोठडी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला इतर आरोपी अजूनही मोकाटच आहेत. याच गुन्ह्यातील चाटे आणि घुले यांचा मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातही समावेश आहे. त्यामुळे या खंडणीच्या प्रकरणाकडेही गांभीर्याने पाहिले जात आहे. याच खंडणीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने शुक्रवारी दुपारी मंजीली वाल्मीक कराड यांना परळी येथून बोलावून घेतले. तर जिल्हाध्यक्ष चव्हाण यांना लातूर येथील घरून सीआयडीच्या पथकाने बीडला आणले.

या दोघांचीही चौकशी बीड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आले. साडे आठ वाजता कराड यांना तर साडे नऊ वाजता चव्हाण यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. त्यांना पुन्हा शनिवारी हजर राहण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

सीआयडीचे अधिकारी ठाण मांडूनसीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बोरडे, उपमहानिरीक्षक बसवराज तेली आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे शुक्रवारी दिवसभर बीडमध्ये ठाण मांडून होते. या तिनही अधिकाऱ्यांनी कराड व चव्हाण यांची चौकशी केली. रात्री साडे नऊवाजेच्या सुमारास सर्व अधिकारी शहर पोलिस ठाण्याबाहेर पडले. पाटील यांना याबाबत विचारल्यावर नो कॉमेंटस असे म्हणून त्यांनी माध्यमांना बोलणे टाळले.

पोलिस अंगरक्षकांचीही चौकशी?

वाल्मीक कराड यांचे पोलिस अंगरक्षक असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनाही सीआयडीच्या पथकाने बीड शहर पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्यांची चौकशी केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे मोबाईल जप्त करून व्हाट्सअप डाटा रिकव्हर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत अधीक्षक पाटील यांना विचारल्यावर त्यांनी बोलणे टाळले, त्यामुळे याला दुजोरा मिळाला नाही.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDhananjay Mundeधनंजय मुंडे