Big news; Beed's DHO corona positive on the 18th day after vaccination | मोठी बातमी; लस घेतल्यानंतरही 18 व्या दिवशी बीडचे डीएचओ कोरोना पॉझिटिव्ह

मोठी बातमी; लस घेतल्यानंतरही 18 व्या दिवशी बीडचे डीएचओ कोरोना पॉझिटिव्ह

ठळक मुद्देदुसरा डोस घेण्यापूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

- सोमनाथ खताळ

बीड : येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे 18 दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोना लस घेतली होती. सध्या ते रुग्णालयात दाखल असून प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बीडमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोरोनाला वेशीवर रोखण्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेची भूमिका महत्वाची होती. चेक पोस्ट तपासणी, हॉटस्पॉट भागात जाऊन पाहणी करणे अशी कामे डॉ. पवार यांनी केली होती. पण सुदैवाने त्यांना कोरोनाने घेरले नाही. महिन्यापूर्वीच त्यांची एक कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण सोमवारी थोडा त्रास जाणवल्याने त्यांनी अँटीजन टेस्ट केली. यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सूरु असून प्रकृती स्थिर आहे.

१२ फेब्रुवारीला घेतली लस
डॉ. पवार यांनी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णलयात लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेतली होती. दुसरा डोस घेण्यापूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

माझ्या समपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी. तसेच गृह अलगीकरणात राहावे. सर्वांनी काळजी घ्यावी. 
- डॉ आर बी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

Web Title: Big news; Beed's DHO corona positive on the 18th day after vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.