भोकरीचे झाड पिवळ्या फळांनी लगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:33+5:302021-07-01T04:23:33+5:30
.... तुरीच्या कोवळ्या रोपांवर पाखरांचा डल्ला शिरूर कासार : तालुक्यात तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या कोवळ्या रोपांच्या ...

भोकरीचे झाड पिवळ्या फळांनी लगडले
....
तुरीच्या कोवळ्या रोपांवर पाखरांचा डल्ला
शिरूर कासार : तालुक्यात तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या कोवळ्या रोपांच्या बुडाला असलेल्या भिजलेल्या तुरीवर पाखरे ताव मारतात. परिणामी, कोवळे रोपे वाया जात आहेत. जागा रिकामी राहू नये, म्हणून त्या जागेवर पुन्हा बियाणे टाकून जागा सांधली जात आहे.
...
माळेगांव चकला तलावाचा तळ उघडाच
शिरूर कासार : जून महिना संपत आला, तरीही माळेगांव चकला येथील तलावाचा तळ अजूनही उघडाच आहे. शेतपेरणीसाठी पाऊस समाधानकारक झाला आहे. असे असले, तरी अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने तलावाचे तळ उघडेच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
...
भुसार मालाची आवक थंडावली
शिरूर कासार : सध्या शेतकरी शेतीकामात व्यस्त आहेत. यामुळे मोंढ्यात भुसार मालाची आवक थंडावली आहे. येत्या आठ दिवसांत मोठा पाऊस झाला, तर मोंठ्यात पुन्हा शेतीमालाची आवक वाढेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
....