भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST2021-04-16T04:34:14+5:302021-04-16T04:34:14+5:30
आष्टी : जामखेडकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीवरील एक जण ...

भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, एक ठार
आष्टी : जामखेडकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीवरील एक जण तरूण जागीच ठार तर दुसऱ्या दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. १५ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
नगर - बीड रोडवरील पांढरी नजीक जामखेडकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या कारने ( क्र. एम. एच. १२ क्यू. टी. ७८४८) दोन दुचाकींना जोराची धडक दिली. या अपघातात पांढरी येथील पोपट छगन शिंदे ( ३२) हा तरुण जागीच ठार झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील जामखेड येथील गणेश काळे,जयश्री गणेश काळे, एक लहान बाळ हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी आष्टी पोलीस ठाण्याचे पो.कॉ.सचिन कोळेकर,होमगार्ड अशोक हंबर्डे, कृष्णा वांढरे यांनी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
===Photopath===
150421\img-20210415-wa0475_14.jpg~150421\img-20210415-wa0461_14.jpg