काळाबाजारासाठी भरारी पथके नेमावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:57+5:302021-07-08T04:22:57+5:30
दुचाकीस्वारांना होतोय धुळीचा त्रास अंबाजोगाई : शहरातील रिंगरोडचे काम गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने एका बाजूने ...

काळाबाजारासाठी भरारी पथके नेमावीत
दुचाकीस्वारांना होतोय धुळीचा त्रास
अंबाजोगाई : शहरातील रिंगरोडचे काम गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने एका बाजूने रस्ता उखडून व खाेदून ठेवला. मात्र रस्त्याचे काम केले नाही. परिणामी रस्त्यावर मोठी धूळ साठली आहे. याचा मोठा त्रास वाहनचालकांना होत आहे. या रस्त्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
कर्जवसुली थांबविण्याची मागणी
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ बंद आहे. सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचत गटांना बँकांनी दिलेले कर्जांची वसुली काही काळ थांबविण्यात यावी. या कालावधीतील व्याजदरही रद्द करावेत, अशी मागणी होत आहे.
राडी-मुडेगाव रस्त्यावर मोठे खड्डे
अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा, अन्यथा त्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी मुडेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
अनुदानात वाढ करण्याची मागणी
बीड : निराधारांना शासनाकडून दर महिन्याला अत्यल्प अनुदान दिले जाते. दिले जाणारे हे अनुदान अत्यंत कमी प्रमाणात आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानातही वाढ करण्यात यावी. तसेच सध्या कोरोनाच्या काळात कामे उपलब्ध नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा लाभार्थींच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी निराधारांमधून केली जात आहे.
झुडपे वाढल्याने नागरिकांना त्रास
बीड : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यानजीक काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यावर्षी मोठ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साठलेले राहिल्याने परिसरात काटेरी झुडपांची मोठी वाढ झाली. आता ही झुडपे रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. अनेकांना या काटेरी झुडपामुळे इजाही झालेली आहे.