भर रस्त्यावरील किराणा दुकान फोडले; सव्वालाखांचे गोडतेल डब्बे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:19+5:302021-02-05T08:23:19+5:30
: धारूर येथील तेलगाव रोडवरील भर रस्त्यावरील होलसेल किराणा मालाचे दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून गोडतेलाचे डब्बे व नगदी पैसे ...

भर रस्त्यावरील किराणा दुकान फोडले; सव्वालाखांचे गोडतेल डब्बे लंपास
: धारूर येथील तेलगाव रोडवरील भर रस्त्यावरील होलसेल किराणा मालाचे दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून गोडतेलाचे डब्बे व नगदी पैसे असा सव्वालाख रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारूर तेलगाव रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी हुतात्मा स्मारकासमोर असणारे होलसेल किराणा माल विक्रीचे तिरूपती ट्रेंडीग कंपनी हे दुकान २६ जानेवारी रोजी पहाटे दुकानाचे दक्षिणेकडील शटर तोडून चोरट्यानी दुकानातील गोडतेलाचे पंधरा किलोचे ६० डब्बे व नगदी पैसे असा एक लाख पंचेवीस हजार आठशे रुपयाचा माल चोरून नेला. सकाळी ही चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अक्षय भावठानकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे हे करत आहेत. या घटनास्थळाला पोलीस उपअधिक्षक भगवानराव सावंत ,पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी भेट देऊन पाहणी केली. हि चोरीची घटना भरवस्तीत व रस्त्यावर झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे