भाग्यश्री नहार यांचे सीए परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:21+5:302021-02-05T08:25:21+5:30
बीड : नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटन्ट परीक्षेत बीड येथील भाग्यश्री प्रणयकुमार नहार यांनी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊन ...

भाग्यश्री नहार यांचे सीए परीक्षेत यश
बीड : नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटन्ट परीक्षेत बीड येथील भाग्यश्री प्रणयकुमार नहार यांनी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊन सी.ए.ची पदवी प्राप्त केली. येथील सीए प्रकाशचंद नहार यांच्या सून व आयआरएस प्रणयकुमार नहार यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी सीएच्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
बीड : शहरातील एमके ग्रुपतर्फे खासबाग येथे सन बॉल टुर्नामेंट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुजफ्फर खान चषकाचे प्रथम पारितोषिक फाईन क्लब, द्वितीय पारितोषिक एमके स्पोर्टिंग क्लब, तर तृतीय पारितोषिक अफान या संघाने पटकावले. ही पारितोषिके समाजसेवक मुसा खान पठाण, मकसूद खान व सुलतान बाबा यांच्या हस्ते देण्यात आली. तिन्ही संघांचे कॅप्टन व प्लेयर्स उपस्थित होते.
हृषीकेश शेळके यांचा सत्कार
बीड : पाटोदा गटशिक्षणाधिकारीपदी हृषीकेश शेळके यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यावेळी राजर्षी शाहू कन्या विद्यालयातील शिक्षक बी.के. कुकडे, बी.बी. चव्हाण, जी.एस. झोडगे, के. बी. सोंडगे, एल. आर. मुंडे, एम. एच. आगलावे, आर. टी. राऊत यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.