सोडत पद्धतीने लाभार्थी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:57+5:302021-03-13T04:59:57+5:30
विधि महाविद्यालयात अभिवादन बीड : येथील स्वातंत्र्यसेनानी रामराव आवरगावकर विधि महाविद्यालय बीड येथे यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात ...

सोडत पद्धतीने लाभार्थी निवड
विधि महाविद्यालयात अभिवादन
बीड : येथील स्वातंत्र्यसेनानी रामराव आवरगावकर विधि महाविद्यालय बीड येथे यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. गोपाल यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पी. पी. वाघमारे, प्रा. एस. ए हराळे, एस. टी. वायाळ, जी. बी. नरवडे, यु. डी. थोरात, इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी
बीड : येथील मिल्लिया कन्या माध्य. शाळेत शासनाच्या अधिसूचनेनुसार महिला शिक्षिकेची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करावी, अशी मागणी अ. भा. उर्दू शिक्षक संघाचे सिद्दीकी अहेमद मंजूर अहेमद यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
विधि महाविद्यालयात महिला दिन उत्साहात
बीड : येथील स्वा. से. रामराव आवरगाव विधि महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्ताने प्राचार्य डॉ. डी. गोपाल यांच्या हस्ते माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. पी. पी. वाघमारे, प्रा. डॉ. अनिसुर रहेमान, प्रा. सुनील हराळे, आदी उपस्थित होते.
बाजारपेठेतील पथदिवे अद्यापही बंदच
बीड : शहरातील व्यापारपेठ असलेल्या डीपी रोड, सुभाष रोड भागातील काही पथदिवे अद्यापही बंद आहेत. मध्यंतरी या भागातील सर्वच पथदिवे बंद होते. पालिका आणि वीज कंपनीच्या वादात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी आहे.
बीडमध्ये स्वच्छतेची नागरिकांमधून मागणी
बीड : नगरपालिकेने शहरातील सर्व भागामध्ये रस्ते व गटारींची स्वच्छता नियमित करावी, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क व इतर नियमांचे बंधन असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेनेदेखील आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.