प्रधानमंत्री स्वनिधी सन्मान योजनेपासून लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:44+5:302021-01-08T05:48:44+5:30
धारूर नगर परिषदेमार्फत शहरात प्रधानमंत्री स्वनिधी सन्मान योजना राबविण्यात आली होती. विशेषतः हे योजना जे छोटे व्यवसायिक आहेत त्यांच्या ...

प्रधानमंत्री स्वनिधी सन्मान योजनेपासून लाभार्थी वंचित
धारूर नगर परिषदेमार्फत शहरात प्रधानमंत्री स्वनिधी सन्मान योजना राबविण्यात आली होती. विशेषतः हे योजना जे छोटे व्यवसायिक आहेत त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी म्हणून संपूर्ण देशात मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ व्यावसायिकांना मिळावा यासाठी धारूर नगरपालिका प्रशासनाने तत्परता दाखवली; परंतु शहरातील तेलगाव रोड स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेने या सन्मान योजेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांची चांगलीच फजिती केली आहे. या प्रकरणात बँक प्रशासनाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन वारंवार चकरा मारून निराश झालेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री स्वनिधी सन्मान योजेनेंतर्गत छोट्या व्यवसायासाठी १० हजार रुपयांचे कर्ज तत्काळ वितरण करण्याचा आदेश द्यावा अन्यथा आपल्या शाखेसमोर बोंबा मारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व मानव अधिकार परिषदेचे जिल्हा प्रमुख अतीक मोमीन यांनी या निवेदनाद्वारे शाखा व्यवस्थापकांकडे केली आहे.