बेलेश्वर संस्थानाचा लोकसहभागातून होतोय विकास - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:03+5:302021-03-07T04:30:03+5:30

बीड : जिल्ह्यातील पुरातन श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या संस्थानात मूलभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी पंचक्रोशीतील भक्तगण ...

Beleshwar Sansthan is developing through public participation - A | बेलेश्वर संस्थानाचा लोकसहभागातून होतोय विकास - A

बेलेश्वर संस्थानाचा लोकसहभागातून होतोय विकास - A

बीड : जिल्ह्यातील पुरातन श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या संस्थानात मूलभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी पंचक्रोशीतील भक्तगण एकवटले असून देवस्थानचा भक्तांच्या योगदानातून विकासाचे आदर्श स्वरूप निर्माण होत आहे. बेलेश्वर देवस्थानचे महंत महादेव महाराज व तुकाराम भारती महाराज यांच्या पुढाकारातून विकास कामांना गती मिळाली आहे.

खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या खासदार निधीतून सभामंडप पूर्ण झाला.

परंपरेनुसार महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. भव्यदिव्य सप्ताह व अन्नदानाचे आयोजन केले जाते. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवाऱ्याची नितांत गरज होती. शासकीय मदतीवर अवलंबून न राहता परिसरातील वीस गावांनी एकत्रित येऊन गावागावातून आर्थिक मदत जमा करून भव्य कीर्तनमंडप उभारण्यात आला. या कीर्तन मंडपामुळे बेलेश्वर संस्थानच्या प्रगतीमध्ये मौलिक भर पडली आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने भक्त या सभामंडपात बसून ईश्वर नामाचे चिंतन करू शकतात.

लोकसहभागातून धर्मपीठांचा विकास साधण्याचा आदर्श पायंडा बेलेश्वर भाविक भक्तांनी निर्माण केला. श्रद्धा, भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम बेलेश्वर येथे अनुभवास येतो, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी स्वखर्चातून स्वयंपाकगृह खोली बांधून देण्याचा संकल्प केला होता. आज या खोलीचे भूमिपूजन महंत महादेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तुकाराम भारती महाराज, किसनराव शेळके, नवनाथ शेळके, भीमराव मस्के, सचिव बाबूराव शेळके, सदस्य अशोक शेळके, मरलीधर ढास सर, केशवराव शेळके, डिगांबर शेळके, भगवान इंगोले, बाबूराव इंगोले, शहादेव वायभट, बालाजी शेळके, अवधूत ढास आदी मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षी महाशिवरात्री यात्रेनिमित्त वार्षिक हरिनाम सप्ताह पार पडत असतो; परंतु यावर्षी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महाशिवरात्री यात्रा रद्द केली आहे व ईश्वरीय सेवेत खंड पडू नये यासाठी वीणा उभी केलेली आहे. यामुळे भाविक भक्तांनी कोरोनाची दखल घेऊन महाशिवरात्री यात्रेस येऊ नये, असे आवाहन महंत महादेव महाराज यांनी केले आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी स्वखर्चातून स्वयंपाकगृह खोली बांधून देण्याचा संकल्प केला होता. या खोलीचे भूमिपूजन महंत महादेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

===Photopath===

050321\3059052_bed_18_05032021_14.jpg

===Caption===

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी स्वखर्चातून स्वयंपाकगृह खोली बांधून देण्याचा संकल्प केला होता. या खोलीचे भूमिपूजन महंत महादेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Beleshwar Sansthan is developing through public participation - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.