हिवऱ्याच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:24+5:302021-02-05T08:23:24+5:30

परळी तालुक्यातील मौजे हिवरा ते पारगाव या गट नंबर १७ मधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी तेथील शेतकऱ्यांनी ...

Behind the hunger strike of winter farmers | हिवऱ्याच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे

हिवऱ्याच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे

परळी तालुक्यातील मौजे हिवरा ते पारगाव या गट नंबर १७ मधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी तेथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. पंकजा मुंडे यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या ऐकून घेतली आणि महसूलच्या अधिका-यांना या प्रकरणात अतिक्रमण करणा-या विरुध्द तात्काळ कारवाई करण्यास सूचित केले. उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्या आश्वासनानंतर आणि पंकजा मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, हिवरा येथील भाजपा नेते वृक्षराज निर्मळ, बंडू निर्मळ, उपोषणकर्ते शेतकरी रघवीर रासवे, ज्ञानेश्वर म्हेत्रे, सुदाम रासवे, भगवान रासवे, तात्यासाहेब घोडके आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Behind the hunger strike of winter farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.