अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने कोविड योद्धा, गुणवंत कर्मचारी व लाभार्थी गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST2021-07-19T04:22:25+5:302021-07-19T04:22:25+5:30

या कार्यक्रमास आ. संजय दौंड, जि.प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जि.प. गटनेते अजय मुंडे, गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर, पं.स. ...

On behalf of Ambajogai Panchayat Samiti, Kovid Yodha, meritorious staff and beneficiary honor ceremony | अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने कोविड योद्धा, गुणवंत कर्मचारी व लाभार्थी गौरव सोहळा

अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने कोविड योद्धा, गुणवंत कर्मचारी व लाभार्थी गौरव सोहळा

या कार्यक्रमास आ. संजय दौंड, जि.प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जि.प. गटनेते अजय मुंडे, गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर, पं.स. सभापती आलिशान पटेल, माजी उपसभापती तानाजी देशमुख, ताराचंद शिंदे, जि.प. सदस्य शंकर उबाळे, जि.प. सदस्य बालासाहेब शेप, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात दिव्यांग लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या उत्पन्नातील पाच टक्के राखीव निधीतून प्रत्येकी एकवीस हजार रुपये किमतीच्या आठ पिठाच्या गिरण्या देण्यात आल्या.

प्रातिनिधिक स्वरूपावर पंचायत समितींतर्गत वैयक्तिक विहिरी मंजूर करण्यात आलेल्या ११ लाभार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल पूर्ण केलेल्या सात लाभार्थ्यांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पंचायत समितीच्या उमेद कक्षामार्फत संपूर्ण तालुक्यात बचत गट स्थापना व बळकटीकरण करण्यात येते. त्याअंतर्गतच बर्दापूर येथील संत सावता माळी बचत गट या आदर्श गटातील महिलांचा सत्कार करण्यात आला आणि प्रातिनिधिक स्वरूपावर दीड लाख रुपयांचे बँकेकडील कर्ज मंजुरी आदेशपत्र देण्यात आले.

180721\img-20210717-wa0104.jpg

अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम

Web Title: On behalf of Ambajogai Panchayat Samiti, Kovid Yodha, meritorious staff and beneficiary honor ceremony