‘नॅक’च्या उद्बोधन वर्गास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:22+5:302021-03-13T04:58:22+5:30
नेकनूर शाखा सल्लागारपदी झोडगे बीड : वैद्यनाथ बँकेच्या नेकनूर शाखा सल्लागारपदी शरद झोडगे यांची नियुक्ती करण्यात आली. निवडीबद्दल त्यांचा ...

‘नॅक’च्या उद्बोधन वर्गास सुरुवात
नेकनूर शाखा सल्लागारपदी झोडगे
बीड : वैद्यनाथ बँकेच्या नेकनूर शाखा सल्लागारपदी शरद झोडगे यांची नियुक्ती करण्यात आली. निवडीबद्दल त्यांचा बीड शाखेत सत्कार करण्यात आला. संचालक उज्ज्वल कोटेचा, बापूराव पवार, फारूख शेख, शाखा व्यवस्थापक काबरा, सुहास झोडगे, राहुल झोडगे, प्रतापसिंह झोडगे, रामकिसन कळासे, प्रवीण जोगदंड, मधुकर जाधव, मोहन जोगदंड, भास्कर जोगदंड, रामभाऊ जोगदंड, सुधीर चौधरी उपस्थित होते.
पेशवा महिला संघटनेतर्फे सत्कार
अंबाजोगाई : येथील पेशवा महिला संघटनेतर्फे महिला दिनानिमित्त स्वारातीमधील कोरोना वॉर्डात रुग्णांना सेवा देऊन मानसिक आधार देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी अनिल तुरुकमाने, सविता तुरुकमाने, शैलेंद्र देशपांडे व मनीषा देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा कल्याणी सोनेसांगवीकर, राजश्री पिंपळे, प्रतीक्षा जोशी, प्रणिता पोखरीकर, अनिता औटी, शुभांगी पत्की, ज्योत्स्ना लाटकर, अपर्णा भालेराव यांनी यासाठी प्रयत्न केले.
कांदा पीक
बहरू लागले
बीड : माजलगाव व तालुका परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने रबी पिके बहरात आहेत. ऊस, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके बहरात आहेत. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी घेतलेल्या कांदा पिकाला योग्यवेळी मिळालेले पोषक वातावरण यामुळे तालुका परिसरातील शेतशिवारात कांदा बियाणाचे पीक बहरल्याचे दिसून येत आहे. यामुळे कांदा उत्पादनात वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे.
नांदलगाव येथे कामांना प्रारंभ
बीड : गेवराई तालुक्यातील मौजे नांदलगाव, मालेगाव मजरा, सिंदफणा चिंचोली येथे विविध विकास कामांचा बुधवारी आरंभ करण्यात आला. माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते बुधवारी अनेक विकास कामांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती शाम मुळे, माऊली आबूज, शेख मुसा, रमेश वाघमारे, मेघराज कादे, रवी शिर्के, दत्ता घवाडे, शेख तैमूर, सरपंच सुनील राऊत आदी उपस्थित होते.
सभागृहाचे काम सुरू करण्याची मागणी
बीड : आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून दलित वस्ती सभागृहासाठी १० लक्ष रुपये मंजूर होऊन टेंडर झालेले आहे, तरी देखील अद्याप सदरील बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही. तरी या सभागृहाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे, अन्यथा उपोषणाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सर्जेराव खंडागळे, भाऊसाहेब वाघमारे, प्रभाकर खंडागळे, बिभीषण खंडागळे, अनिल खंडागळे आदींनी दिला आहे.
कोरोना नियमांची होतेय पायमल्ली
बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. नागरिकांनी मास्क लावून गरज असेल तरच फिरावे, असे आवाहन केले जात आहे. तरीही याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असून, धोका वाढत चालला आहे.