बीड : देशभरातील कृषी कीटकनाशक विक्रेत्यांना परवाना नूतनीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १२ दिवसांच्या क्रॅश कोर्सची सुरुवात महाराष्ट्रात नुकतीच सुरू करण्यात आली. बीड येथील कृषी महाविद्यालयात महाराष्ट्रातील पहिली व देशातील तिसरी बॅच सुरू करण्यात आली आहे.
या क्रॅश कोर्समुळे गेल्या पाच वर्षांपासून कृषी विक्रेत्यांचा परवाना नूतनीकरणाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील पहिली बॅच बीड येथे सुरू करण्यात आली. कृषी महाविद्यालय प्रशासन व कृषी विभागाच्या सहकार्याने हा क्रॅश कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सच्या माध्यमातून देशभरातील तीन लाख कृषी विक्रेते प्रशिक्षण घेणार आहेत. इतर राज्यांमध्येही अशा प्रकारच्या बॅचेस लवकरच सुरू करण्यात येतील, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी दिली. या कोर्ससंबंधी त्यांनी सविस्तर माहिती दिली. भविष्यात एकही कृषी निविष्ठा विक्रेता या कोर्सपासून वंचित राहणार नाही याची ग्वाही कलंत्री यांनी दिली. यावेळी के. एस. के. महाविद्यालय समूहाचे प्राचार्य सोळुंके, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे, कृषी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी, जिल्हा कृषी साहित्य विक्रेता असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सत्यनारायण कासट, ज्येष्ठ वितरक प्रमोद निनाळ, माफदाचे संचालक जयकिशोर बियाणी तसेच चाळीस कृषी निविष्ठा वितरक उपस्थित होते.
===Photopath===
130321\132_bed_4_13032021_14.jpeg
===Caption===
कृषी विक्रेत्यांच्या क्रॅश कोर्सला बीडमध्ये सुरूवात झाली.