बीडचे नवे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:40 IST2019-07-16T00:40:22+5:302019-07-16T00:40:55+5:30

बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची भारत राखीव बटालियन गट क्र. १३ वडसा देसाईगंज, जि.गडचिरोली येथे समादेशक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी बीड पोलीस अधीक्षकपदावर नागपूरवरुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Beed's new Superintendent of Police Harsh Poddar | बीडचे नवे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार

बीडचे नवे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार

बीड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी झाल्या. 
बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची भारत राखीव बटालियन गट क्र. १३ वडसा देसाईगंज, जि.गडचिरोली येथे समादेशक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी बीड पोलीस अधीक्षकपदावर नागपूरवरुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हर्ष पोद्दार हे नागपूर येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. येत्या काळात विधानसभा निवडणूक आहे, बीड जिल्हा हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो, त्यामुळे निवडणुका भयमुक्त वातावरणात व निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान पोद्दार यांच्यापुढे असणार आहे.
अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांची बदली राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी उस्मानाबादच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हांतर्गत पोलिसांच्या बदल्या होणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Beed's new Superintendent of Police Harsh Poddar