शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या अल्पवयीन मुलीवर फेसबुक फ्रेंडचा कोल्हापुरात अत्याचार; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 11:45 IST

बीड - बीडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ...

बीड- बीडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील १६ वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी समद महंमद तहसीलदार (१९,रा.खेबळी, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) याच्याशी ओळख झाली. त्याच्या प्रेमात वाहवत गेलेली मुलगी २४ मे रोजी घरात कोणाला न सांगता बीडहून कोल्हापूरला गेली. तेथील आग्रा येथे २५ मे रोजी एका बंद स्थितीतील विश्रामगृहात त्या दोघांनी मुक्काम केला. यावेळी समद तहसीलदारने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, २६ रोजी सकाळी त्या दोघांना स्थानिकांनी पकडून पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. बीड ग्रामीण ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद होता.

आरोपीसह पीडितेला घेऊन पथक बीडमध्ये

मुलगा व मुलगी कोल्हापुरात सापडल्याची माहिती मिळाल्यावर बीड ग्रामीण ठाण्याचे पो.नि. संतोष साबळे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ए.बी.गायकवाड, किशोर राऊत हे २७ मे रोजी कोल्हापूरला गेले. तेथून त्या दोघांना घेऊन ते २८ रोजी बीडला पोहोचले. अपहरणाच्या गुन्ह्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम वाढविले असून तपास पिंक मोबाइल पथकाच्या उपनिरीक्षक मीना तुपे करत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणBeedबीडPoliceपोलिस