शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये भाजपासाठी चुरशीची लढाई, पण अमेरिकेत गेल्यात पंकजाताई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 13:36 IST

आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १९, कॉँग्रेस ३, भाजपा १९, शिवसंग्रामचे ४, शिवसेनेचे ४, काकू - नाना आघाडीचे २, अपक्ष २ असे बलाबल आहे.

ठळक मुद्देशनिवारी होणार मतदान१३ जानेवारीपर्यंत निकाल राखीव 

बीड : बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी सभा होत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास (महिला) प्रवर्गासाठी आहे. निकाल कळायला १३ जानेवारी उजाडणार आहे.  शनिवारी मतदान होणार असले तरी  कुणाच्या गळ्यात अध्यक्ष, उपाध्यक्षांची माळ पडली हे हायकोर्टाच्या आदेशामुळे १३ जानेवारीनंतरच कळणार आहे.

महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून विरोधकांच्या संख्याबळासच सुरुंग लावला असल्याचे सुत्राने सांगितले. संख्याबळ आमच्याकडे असल्याचे आघाडीतर्फे सांगण्यात येत आहे. कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंनी जिल्हा परिषद निवडणुकीत आमचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, दुसरीडे पंकजा मुंडेंनी निवडणुकीची जबाबदारी खासदार प्रितम मुंडेंवर सोपवली असून त्या विदेशात गेल्या आहेत. 

मोर्चेबांधणी : राजकीय हालचालींना वेगराज्यातील सत्तांतरानंतर बीड जिल्हा परिषदेतील घडामोडींबद्दल उत्सुकता लागली आहे. भाजपचे प्राबल्य असलेल्या जिल्हा परिषदेवर ताबा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने मोर्चेबांधणी केली आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रवादीच्या  बैठकीत राजकीय खलबते झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीस मंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, संजय दौंड, राजेसाहेब देशमुख व इतर नेते उपस्थित होते. तर, माजी मंत्री बदामराव पंडितही या बैठकीला होते, अशी माहिती मिळाली आहे. दुसरीकडे सहलीवर गेलेले भाजप गटाचे सदस्य रात्री बीडमध्ये पोहचले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर राजेंद्र म्हस्के, रमेश आडस्कर, प्रीतम मुंडे यांच्याकडे जबाबदारी असून पंकजा मुंडे आज येणार अशी माहिती होती, पण त्या आल्या नाहीत. या सगळ्या घडामोडींमध्ये सुरेश धसही कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे भाजपाने निवडणुकीत औपचारिकताच ठेवली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

शिरसट, सोळंके यांची नावे चर्चेत राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी घाटनांदूर गटातील शिवकन्या शिरसट तर उपाध्यक्ष पदासाठी तेलगाव गटातून जयसिंह सोळंके यांची नावे चर्चेत आहेत. मात्र भाजपच्या वतीने रात्री उशिरापर्यंत कोणाचेच नाव पुढे आलेले नव्हते. शिवसेनेकडे ४ सदस्य असल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या सदस्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. 

५३ सदस्य करणार निवडजिल्हा परिषदेतील ६० पैकी पाच सदस्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. संदीप क्षीरसागर आणि बाळासाहेब आजबे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन सदस्य कमी झाले आहेत. त्यामुळे ५३ सदस्यांतून निवडणूक होईल.

शिवसंग्रामचा व्हिपआता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १९, कॉँग्रेस ३, भाजपा १९, शिवसंग्रामचे ४, शिवसेनेचे ४, काकू - नाना आघाडीचे २, अपक्ष २ असे बलाबल आहे. शिवसंग्रामचे चारही सदस्य सध्या भाजपवासी आहेत. शिवसंग्रामकडे आता एकही सदस्य नसताना मात्र तटस्थ राहण्याबाबत व्हिप जारी केला आहे. 

आम्ही महाआघाडीसोबतमागच्या वेळी भाजपासोबत असणारे काँग्रेसचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्याशी चर्चा केली असता काँग्रेसचे तीनही सदस्य महाआघाडी सोबत आहोत, असे त्यांनी सांगितले. आमच्या नेत्या रजनीताई पाटील यांनी आम्हाला तसा आदेश दिला आहे. मुंबईत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, रजनीताई पाटील यांच्या उपस्थित बैठक झाली त्यात आम्हाला महाआघाडीसोबत राहण्याचा आदेश आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रमदुपारी १२ ते २ वाजेपर्यंत सभेच्या स्थळी नामनिर्देशपत्र स्वीकारण्यात येणार आहे. २ वाजता विशेष सभेला प्रारंभ होईल. २ ते २.३० या वेळेत नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. २.४५ पर्यंत वैध उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. नंतर नामनिर्देशनपत्र माघार घेण्यासाठी ३ वाजेपर्यंत वेळ दिला जाईल. आवश्यकता भासल्यास मतदान, असा निवडणूक कार्यक्रम राहणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून प्रविणकुमार धरमकर हे काम पाहणार आहेत. 

निकाल १३ जानेवारीलाखंडपीठाने यापूर्वी जिल्हा परिषदेच्या पाच अपात्र सदस्यांना मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. हा आदेश कायम असल्यामुळे त्या पाच अपात्र सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेता यावा म्हणून याचिका दाखल केली होती. यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल १३ जानेवारी २०२० पर्यंत जाहीर  करू नये, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी गुरुवारी दिलेला आहे.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा