शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये १६ गावांतील ‘जलयुक्त शिवार’ची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:11 IST

जलयुक्त कामांसाठी मागील वर्षी बीड तालुक्यातील समावेश झालेल्या २७ गावांपैकी १६ गावांमध्ये पंचायत समितीच्या नरेगा अंतर्गत कामे सुरू असल्याचे आॅनलाईन रेकॉर्ड आहे. प्रत्यक्षात मात्र या गावांमध्ये कामेच सुरू नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देपंचायत समिती नरेगाचा गोंधळ चव्हाट्यावर; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलयुक्त कामांसाठी मागील वर्षी बीड तालुक्यातील समावेश झालेल्या २७ गावांपैकी १६ गावांमध्ये पंचायत समितीच्या नरेगा अंतर्गत कामे सुरू असल्याचे आॅनलाईन रेकॉर्ड आहे. प्रत्यक्षात मात्र या गावांमध्ये कामेच सुरू नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली. त्याअंतर्गत नदी, नाले खोलीकरण व खोदकाम, तसेच बांध-बंदिस्तीसारखे विविध उपक्रम घेण्यात येतात. बीड तालुक्यात २७ गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश झालेला आहे. त्यापैकी काही कामे कृषी विभाग, जिल्हा परिषद करत आहे. तर पंचायत समिती नरेगा अंतर्गत १६ गावांत ११२ कामांना मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी ८२ कामांना अद्याप सुरूवातच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आॅनलाईन रेकॉर्डला मात्र ही कामे सुरू असल्याचे दाखविले आहे. प्रत्यक्षात मात्र या १६ गावांमध्ये कामेच सुरू नसल्याचे समोर आले आहे. यातील काही कामे मार्च अखेरीस पूर्ण होेणे अपेक्षित होते, परंतु नरेगा विभागाच्या गलथान कारभारामुळे ही कामे पूर्ण होऊ शकली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकºयांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे याच २७ गावांमघ्ये तालुका कृषी विभागामार्फत सुरू असलेले जलयुक्तची कामे गतीने सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले. याचा फायदाही गावासह शेतकºयांना झाल्याचे ते म्हणाले. जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, त्यांचे वर्क कोड काढून कृषी विभागाकडे वर्ग करून ही कामे करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान प्रत्यक्षात बंद असलेली कामे आॅनलाईन रेकॉर्डला चालू दाखविण्यात आल्याने बीड पंचायत समितीच्या नरेगा विभागातील गलथान कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.कायमस्वरूपी ‘बीडीओ’ नसल्याने अडचणीपंचाय समितीमध्ये मागील काही दिवसांपासून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नाहीत. राजेंद्र तुरूकमारे यांच्याकडे पदभार येऊन काही महिनेच झाले होते. त्यानंतर नरेगा मधील विहीर कामांमध्ये अनियमितता असल्यामुळे कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले होते. या प्रकारानंतर तुरूकमारे हे रजेवर गेले. त्यानंतर बीडीओ पदाचा अतिरिक्त पदभार नरेगाचे सुधीर भागवत यांच्याकडे सोपावला. वारंवार अधिकाºयांमध्ये बदल होत आहे. त्यामुळे कामे रखडण्याबरोबरच चालु कामांना गती मिळण्यास अडचणी येत आहेत. याठिकाणी कायमस्वरूपी बीडीओ नियूक्त करण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे.खाजगी लोकांचा हस्तक्षेप वाढलामागील काही दिवसांपासून पंचायत समिती चर्चेत आहे. राजकीय नेते, कार्यकर्ते व इतर खाजगी व्यक्तींचा कार्यालयात वावर वाढला आहे. एवढेच नव्हे तर शासकीय कामांमध्येही ते हस्तक्षेप करू लागले आहेत. एखादा अधिकारी, कर्मचारी बोलण्यास गेल्यावर अरेरावीची भाषा करून दबाव आणला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे येथील अधिकारी, कर्मचारी दबावाखाली आहेत. हा हस्तक्षेप थांबवून कार्यालयातील कामे गतीने करावीत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारMarathwadaमराठवाडाzpजिल्हा परिषदPoliceपोलिसStudentविद्यार्थी