शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ऐन दिवाळीत आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेंचा बीड दौरा; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची उडाली झोप

By सोमनाथ खताळ | Updated: October 21, 2022 19:11 IST

तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सुचना केल्या.

बीड : शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे २५ व २६ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. ऐन दिवाळी त्यांनी आरोग्य संस्थांना भेटी देऊन, आढावा घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.

तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सुचना केल्या. तसेच रात्री अचानक तपासणी करण्यासाठी राज्यभरात एकाचवेळी सुचना केल्या होत्या. बीडमध्येही चऱ्हाटा, नाळवंडी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. यात डॉक्टर गैरहजर आढळले होते. त्यानंतर आयुक्तांनी सर्वच अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन रूग्णसेवा सुधारण्याबाबत सुचना केल्या होत्या. आता स्वत: तुकाराम मुंढे हेच ऐन दिवाळीत बीड दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात त्यांनी आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देण्यासह आढावा घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खराब काम असणाऱ्या आरोग्य संस्थांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच धामधुम सुरू असतानाच आयुक्तांचा दौरा पडल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.

जिल्हा रूग्णालयाचा घ्यावा आढावाजिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सुरेश साबळे यांची शुक्रवारी ऑर्डर निघाली. वर्षभरापासून तेच प्रभारी म्हणून काम पहात होते. ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालयांची माहिती घेतली असता दररोज सरासरी एकही प्रसुती होत नसल्याचे समोर आले होते. तसेच जिल्हा रूग्णालयात प्रवेश करताच नाकाला रूमाल लावावा लागत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता, रूग्णसेवेतील अनियमितता आदी समस्या येथे आहेत. अनेकदा औषधीही बाहेरून आणावी लागतात. या सर्वांची खात्री करण्यासाठी आयुक्त मुंढे यांनी जिल्हा रूग्णालयाला भेट देऊन पाहणी तर करावीच, परंतू रूग्णांची संवाद साधून माहितीही घ्यावी, अशी मागणी सामान्यांमधून हाेत आहे.

टॅग्स :Beedबीडtukaram mundheतुकाराम मुंढेBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड