बीड : जिल्ह्यातील 'लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी'मध्ये एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नोकरीधारकांची जातवैधता प्रमाणपत्रे माहिती अधिकारात मिळवून, त्यांच्या संमतीशिवाय त्यांना परस्पर सूतगिरणीचे सभासद दाखवल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरू तुरुकमारे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात गिरणीचे तत्कालीन अध्यक्ष आणि लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, सूतगिरणीचे तत्कालीन लिपिक राजकुमार दयाराम वाव्हळे यांनी २०१७ मध्ये जातपडताळणी समितीकडे माहिती अधिकारात अर्ज केला होता. जानेवारी ते मार्च २०१७ या काळात ज्या ४६४ अर्जदारांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते, त्यांची प्रमाणपत्रे वाव्हळे यांनी हस्तगत केली. त्यात फिर्यादी तुरुकमारे यांचा मुलगा हृषिकेश याच्या प्रमाणपत्राचाही समावेश होता.
संगनमत करून केली फसवणूकलिपिक वाव्हळे आणि सूतगिरणीचे तत्कालीन अध्यक्ष विजयप्रकाश किसनराव ठोंबरे यांनी संगनमत करून या सर्व ४६४ जणांना, त्यांच्या परवानगीशिवाय सूतगिरणीच्या रेकॉर्डवर सभासद म्हणून दाखवले. एवढेच नाही तर ही बनावट यादी प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग (संभाजीनगर) यांच्या कार्यालयातून प्रमाणित करून घेऊन शासनाची आणि संबंधित विद्यार्थ्यांची फसवणूक केली.
अज्ञात कारणासाठी रचले जाळेहा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पीडितांनी संभाजीनगर येथे तक्रार केली होती. त्यानंतर ठोंबरे यांनी हृषिकेशचे नाव यादीतून वगळले असले, तरी शेकडो विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा असा वापर करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी विजयप्रकाश ठोंबरे आणि राजकुमार वाव्हळे यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या घोटाळ्यामागे नक्की काय उद्देश होता, याचा तपास आता सुरू झाला आहे.
कोण आहेत ठोंबरे?विजयप्रकाश ठोंबरे हे केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती आहेत. २०१७ मध्ये हा घोटाळा झाला होता तेव्हा संगीता ठोंबरे या भाजपकडून आमदार होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
Web Summary : A Beed spinning mill fraud involves stolen student caste certificates. Certificates were obtained via RTI and used for mill memberships without consent. A case is filed against the former chairman, husband of ex-MLA, and clerk for the deceit.
Web Summary : बीड की एक कताई मिल में छात्र जाति प्रमाण पत्र चोरी का मामला सामने आया है। आरटीआई के माध्यम से प्रमाण पत्र प्राप्त किए गए और सहमति के बिना मिल सदस्यता के लिए उपयोग किए गए। पूर्व विधायक के पति और क्लर्क पर मामला दर्ज।