शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बीडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीत वाद पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:13 IST

‘अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन दाखवावे, आज पुतळा जाळला, ते ज्यादिवशी येतील, त्यादिवशी त्यांच्यासह गाड्यांचा ताफा जाळू,’ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड येथे सोमवारी दिला.

ठळक मुद्देपवार- ठाकरे वादाचे जिल्ह्यात पडसाद नेत्यासह ताफा जाळण्याचा शिवसेनेचा इशारा राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन दाखवावे, आज पुतळा जाळला, ते ज्यादिवशी येतील, त्यादिवशी त्यांच्यासह गाड्यांचा ताफा जाळू,’ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड येथे सोमवारी दिला. अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना शिवसैनिकांनी आक्रमक होत येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी प्रतिक्रिया देताना खांडे बोलत होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाक रे यांनी अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मंदिर निर्मितीसाठी अयोध्या दौऱ्याचे देखील आयोजन केले आहे, असे ते म्हणाले होते. याविषयी जालना येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलने केली. सोमवारी बीडमध्ये अजित पवार यांच्या पुतळ््याचे दहन करुन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, गणेश वरेकर, जयसिंह चुंगडे, हनुमान पिंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुंडलिक खांडे यांच्या ह्या वक्तव्याचा आणि अजित पवार यांच्या विषयीच्या लिखाणांचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दहन करण्यात आले.परळीत शिवसैनिकांनी लावले पोस्टरपरळी शहरातील बाजार समिती चौकातील, बसस्थानक व मुख्य रस्त्यावरील शौचालयास माजी उपमुख्यमंत्र्यांचा फोटो लावत शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके, शहरप्रमुख राजेश विभुते, युवा सेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, रमेश चौंडे, अभिजित धाकपडे, वैजिनाथ माने, किशन बुंदेले, संतोष उदावंत, श्रीकृष्ण नागरगोजे, बबन ढेंबरे, गोविंद जंगले, अनिल भोकरे, बजरंग औटी, महेश छत्रभूज यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर जिल्ह्यात फिरू देणार नाही...!बीड : अयोध्येतील राममंदिर बांधण्याच्या संदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सुरु असलेल्या वादाचे पडसाद बीड जिल्ह्यात उमटले आहेत. सोमवारी शिवसेनेच्या वतीने अजित पवार यांच्या पुतळ््याचे दहन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे यांच्या पुतळ््याचे दहन करण्यात आले.अजित पवार यांचा पुतळ््याचे दहन केल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिका-यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर म्हणाले, अजित पवार यांच्या ताफ्यातील गाड्या जाळण्याचे तर सोडून द्या, जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तर, तुम्हाला जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही.यावेळी बबन गवते, भाऊसाहेब डावकर, दिलीप भोसले, अमर नाईकवाडे, बळीराम गवते, पंकज बाहेगव्हाणकर, रमेश चव्हाण, बाळासाहेब पोपळे, भैय्यासाहेब मोरे, रणजित बनसोडे, विशाल घाडगे, झुंजार धांडे, मोहन देवकते आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे