कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये बीड मराठवाड्यात दुसऱ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST2021-01-13T05:28:34+5:302021-01-13T05:28:34+5:30

बीड : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात बीड जिल्हा मराठवाड्यात दुसऱ्या स्थानावर आहे. हिंगोली जिल्हा अव्वल असून नांदेड ...

Beed ranks second in contact tracing in Marathwada | कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये बीड मराठवाड्यात दुसऱ्या स्थानावर

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये बीड मराठवाड्यात दुसऱ्या स्थानावर

बीड : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात बीड जिल्हा मराठवाड्यात दुसऱ्या स्थानावर आहे. हिंगोली जिल्हा अव्वल असून नांदेड जिल्ह्याचा क्रमांक सर्वांत शेवटी आहे. सुरुवातीच्या काळात बीड राज्यात अव्वल होता.

मराठवाड्यात आतापर्यंत एक लाख ४८ हजार ७२७ लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी एक लाख ४२ हजार ३९६ जण कोरोनामुक्त झाले असून, चार हजार ३९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना हा संसर्ग संपर्कातून होत असल्याने एखादा रुग्ण बाधित आढळताच त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून इतरांचा शोध घेतला जात असे. हाय रिस्कवाल्यांचा स्राव घेऊन लो रिस्कवाल्यांना क्वारंटाईन केले जात असे. आतापर्यंत मराठवाड्यात २० लाख ९५ हजार ६२९ लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले आहे. याची टक्केवारी प्रतिरुग्ण १४.०९ आहे. सर्वांत जास्त टक्का हिंगोलीचा असून सर्वांत कमी नांदेड आहे. बीड जिल्ह्याचा क्रमांक दुसरा आहे.

एमओ, टीएचओंची भूमिका महत्त्वाची

रुग्ण बाधित आढळताच त्याची नियंत्रण कक्षातून संबंधित वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्याधिकाऱ्यांना माहिती दिली जाते. त्यानंतर लगेच त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात असे. या कामात आशाताई, अंगणवाडी सेविकांपासून ते डीएचओंपर्यंत सर्वांनीच परिश्रम घेतले होते.

कोट

सुरुवातीच्या काळात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना खूप मेहनत घ्यावी लागली. भीतियुक्त वातावरण असल्याने नागरिक पुढे येत नव्हते; परंतु त्यांना विश्वास देऊन हे काम करण्यात आले. बीड जिल्ह्यात ग्राऊंड लेव्हलपासून ते कंट्रोल रूममधील पथकांनी खूप परिश्रम घेतले. सर्वांचेच काम कौतुकास पात्र आहे.

डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्याधिकारी, बीड

अशी आहे आकडेवारी

जिल्हापॉझिटिव्ह रुग्णकॉन्टॅक्ट ट्रेसिंगटक्केवारी डबलिंग रेट

औरंगाबाद ४६१९९ ५१८४९४ ११.२२ ६०९.७०

जालना १३३५९ १९७९०५ १४.८१ २२९.२०

परभणी ७६८९ ८०२२६ १०.४३ २६३.३०

हिंगोली ३५७५ ८६५०० २४.२० ४७.००

नांदेड २०९८८ १७७६७२ ८.४७ ५५१.१०

बीड १७०६९ ४१२११९ २४.१४ ३५१.८०

लातूर २३३१० ४७६६४१ २०.४५ ४५८.७०

उस्मानाबाद १६५३८ १४६०७२ ८.८३ ६०१.९०

एकूण १४८७२७ २०९५६२९ १४.०९ -

Web Title: Beed ranks second in contact tracing in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.