बीड प्रिमिअर लीगचा समारोप ; एम. जे. एलेव्हनला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:44 IST2017-12-25T00:43:42+5:302017-12-25T00:44:05+5:30
बीड जिल्हा हा खेळाडूंची खाण आहे, बीडचे नाव राज्य आणि देश पातळीवर झळकत आहे. खेळाडूंमुळेच खेळाला अधिक महत्व प्राप्त होत असते यासाठी चांगले खेळाडू तयार व्हावेत याकरीता दर्जेदार स्पर्धांचे सातत्याने आयोजन व्हावे असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

बीड प्रिमिअर लीगचा समारोप ; एम. जे. एलेव्हनला विजेतेपद
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्हा हा खेळाडूंची खाण आहे, बीडचे नाव राज्य आणि देश पातळीवर झळकत आहे. खेळाडूंमुळेच खेळाला अधिक महत्व प्राप्त होत असते यासाठी चांगले खेळाडू तयार व्हावेत याकरीता दर्जेदार स्पर्धांचे सातत्याने आयोजन व्हावे असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.
जिल्हा क्रिडा संकुलात आयोजीत बीड प्रिमिअर लीगच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम. जे.इलेव्हनच्या संघाने विजय मिळवला. विजेत्या संघास १ लाख रुपये आणि ट्रॉफी बक्षीस वितरण आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. उपविजेत्या संघास ७५ हजार, मॅन आॅफ द सिरीज २१ हजार असे बक्षीस ठेवण्यात आले.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्याची नाणेफेक डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना एस.आर.के.वॉरीयर्सने निर्धारित २० षटकात ६ बाद १२४ धावा केल्या. यात शेख आरिफ ५७, मुद्दसर चाऊस २० आणि प्रदीप मुंडेच्या २० धावांचे मोगदान होते. एम.जे.एलेव्हनकडून जाफर शेखने २ तर मोमीन सरफराज, कलीम शेख आणि इब्राहिम शेखने प्रत्येकी १ बळी घेतला.
प्रत्युत्तरात एम.जे.एलेव्हनने १६.५ षटकात २ बाद १२४ धावा काढीत अजिंक्यपद पटकावले. यष्टीरक्षक फलंदाज अमोल सानपने नाबाद ५५ धावा काढल्या. त्याला नाबाद १६ धावा काढून इब्राहिम शेखने साथ दिली. कर्णधार श्रीकांत सिरसटने २१ तर मंगेश जाधवने १६ धावा काढून संघाला सुरुवात करून दिली. एस.आर.के.कडून इनामत सय्यद आणि झुल्पिकर कुरेशीने प्रत्येकी एक बळी घेतला.
या सामन्यांमध्ये पंच म्हणून मिलिंद गोरे, रईफोद्दीन नेहरी, स्कोअरर म्हणून शशांक अय्यर आणि समालोचक म्हणून वाजीद खान यांनी काम पाहिले. लीग यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, सचिव प्रा.आमेर सलीम, बीपीएलचे चेअरमन महेश वाघमारे, टेक्निकल कमिटीचे चेअरमन राजन साळवी, प्रा.जावेद पाशा, इरफान कुरेशी, रिझवान खान, शेख शाकेर, अजहर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी परिश्रम घेतले.
हे ठरले मानकरी
अर्धशतकवीर अमोल सानपला सामनावीराचे बक्षीस देण्यात आले. मॅन आॅफ द सिरीज पुरस्कार अष्टपैलू सुनील शेट्टी (मुनिक लाईट हाऊस) बेस्ट बॅट्समन आरिफ शेख (एस.आर. के.वारीयर्स), बेस्ट बॉलर जाफर शेख (एम.जे., एलेव्हन) बेस्ट विकेटकीपर अतिक कुरेशी (अल कुरेश स्टार्स) यांना पुरस्कार देण्यात आले.