शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बीड मतदार संघात प्रचाराच्या तोफा झाल्या शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:11 IST

विकासाचा कलश घेऊन आलेल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरा - पंकजा मुंडे परळी : खा.डॉ. प्रीतमताई मुंडे ही आपली ...

ठळक मुद्देपरळीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या रॅली आणि जाहीर सभा : मतदारांना आवाहन

विकासाचा कलश घेऊन आलेल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरा - पंकजा मुंडेपरळी : खा.डॉ. प्रीतमताई मुंडे ही आपली लेक असून साडेचार वर्षात तिने लक्ष्मीच्या रुपाने जिल्ह्यात विकासाचा सुवर्ण कलश आणला आहे. आपण आपल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरून तिला भरभरून आशीर्वाद द्या, असे भावनिक आवाहन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. परळीत प्रचाराचा समारोप करताना त्या सभेत बोलत होत्या. धो-धो पाऊस सुरू असतानाही भाजप उमेदवार खा.डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा सुरुच होती.पंकजा मुंडे म्हणाल्या की, आम्ही केंद्र आणि शासनाचा भरीव निधी जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ प्रीतम मुंडे यांनी आणला. आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय भरीव अशी विकास कामे केली आहेत. त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करून दाखवले आहे. मात्र आंधळ्या विरोधकांना आम्ही केलेली प्रगती दिसत नाही, असे त्या म्हणाल्या. आमच्या बंधूने केवळ मला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची झूल घातली असून त्यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्यांच्या सत्तेच्या काळात जिल्ह्यात एकही भरीव काम झाले नाही. कागदावर रस्ते दाखवून बगलबच्चांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले. यामुळे विकास खुंटला. या विकासाला गती देण्याचे काम मी आणि डॉ. प्रीतम मुंडेंनी केले आहे. जिल्ह्यात मी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे असे सांगितले. बारामतीकरांचे आपल्या जिल्ह्यावर प्रेम असते तर विकास झाला नसता का, असा सवाल करून आईची माया दाईला येत नसते, असे त्या म्हणाल्या. 

माझ्या भावाने राष्ट्रवादी उद्ध्वस्त केली- प्रीतम मुंडेयावेळी बोलताना खा.डॉ. प्रीतमताई मुंडे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी संपविले तर आमच्या भावाने अख्खी राष्ट्रवादी उद्ध्वस्त केली आहे. उरली सुरली राष्ट्रवादी आगामी काळात पंकजा मुंडे संपवून टाकतील, असे सांगितले. माझी पात्रता विचारणाऱ्या विरोधकांनी त्यांच्या काळात काय कामे केली याचा हिशोब द्यावा, असे सांगून केलेल्या विकासाचा पाढा त्यांनी वाचला. मुंडेसाहेबांच्या नावाची एवढीच अ‍ॅलर्जी आहे तर स्वत:च्या सर्वेसर्वाना बोलावून मुंडेसाहेबांचे विचार मीच चालवतो, असे कौतुक करून घेण्याची गरज का वाटली, असा सवाल त्यांनी केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा विकास होत आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या पारदर्शक विकासासाठी मला पुन्हा ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

मला ओटीत घ्या, ही निवडणूक माझ्या इज्जतीची - धनंजय मुंडेपरळी : ही माझ्या इज्जतीची निवडणूक आहे, मला ओटीत घ्या, तुम्ही माझ्या दोन्हीही बहिणींना भरभरून प्रेम दिल. माझ्यावरही एक वेळ प्रेम दाखवा, शहराचा विकास करून दाखवेल, अशी भावनिक साद राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीकरांना घातली.परळीत राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी सभा झाली. रॅली काढून प्रचाराचा समारोप करताना ते बोलत होते. अण्णा गेल्यानंतर घरातला कर्ता पुरु ष मी आहे, त्यामुळे काहीही झालं तरी तुमचा मोठा भाऊ आहे हे विसरु नका, असं भावनिक आवाहन त्यांनी पंकजा मुंडेंना केलंय. या सभेत धनंजय मुंडेंनी पंकजांवर जोरदार टीका केली. बीड जिल्ह्याने माझ्या दोन्ही बहिणींना भरभरून दिलं. राज्यात आणि केंद्रात सत्ता दिली. पण माझ्या बहिणीला माझ्याशिवाय कोणीच दिसेना. पंकजाताई, तुम्हाला नेमका कशाचा गर्व आणि घमेंड आहे? सत्ता येते आणि जाते, आपले राजकीय वैर असले तरी मी तुमचा मोठा भाऊ आहे हे लक्षात ठेवा, असं म्हणत त्यांनी पंकजांवर प्रहार केला. पंकजा मुंडेंकडूनच जातीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय.मला विरोधी पक्ष नेते करताना पवार साहेबांनी माझी जात पाहिली नाही. तुम्ही जातीयवाद करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. बॅनरवरील माझा फोटो टॉप 3 मध्ये आहे. हे वारसा हक्काने नाही तर कर्तृत्वाने मिळाले आहे, असे मुंडे म्हणाले.

सर्वसामान्य माणसाला संधी द्या- बजरंग सोनवणेमी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आहे. पक्षाने मला संधी दिली. या संधीचे सोने करुन तुमच्या समस्या सोडविल्याशिवाय राहणार नाही. यासाठी मला निवडून देऊन दिल्लीत पाठवा. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची मला जाण आहे. या भागाचा विकास करण्यासाठी मतदारांचे सहकार्य आवश्यक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मतदारांना आवाहन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे