बीड : गेवराई नगर परिषद निवडणुकीदरम्यान पंडित विरुद्ध पवार या कुटुंबांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. मतदानाच्या दिवशी दोन्ही गट एकमेकांना भिडले आणि यातून मोठा राडा उफाळून आला. या घटनेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना जबर मारहाण झाली. त्यांनी हल्लेखोर माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या खुनाच्याच इराद्याने आले होते, असा खळबळजनक दावा केला आहे.
अमृत डावकर यांच्यावर सध्या बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट पवार कुटुंबाने रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. जखमी डावकर यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, "मी कार्यालयाच्या समोर उभा असताना बाळराजे पवार आणि त्यांच्यासोबत पाच ते सहा गुंड प्रवृत्तीचे लोक आले. त्यांनी थेट त्यांची स्कॉर्पिओ आमच्या कार्यालयाच्या दारात उभ्या असलेल्या स्कॉर्पिओवर धाडकन आदळली." ते पुढे म्हणाले, "त्यांनी पहिल्यांदा अमरसिंह पंडित साहेबांच्या नावाने शिवीगाळ करून 'आज संपवूनच टाकायचंय' असं म्हणत ते धावत कार्यालयाकडे आले. मी हात जोडून विनंती केली असता, 'ते नाही, तर मग आज तुला संपवतो' असं म्हणून त्यांनी काठी, बेल्ट, लाथाबुक्क्याच्या साहाय्याने माझ्यावर हल्ला केला आणि खाली पाडून तोडवलं." असे डावकर यांनी सांगितले.
शिक्षा माफ झालेल्या गुन्हेगारांचा वापर?डावकर यांनी हल्लेखोरांच्या क्रिमिनल पार्श्वभूमीवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, बाळराजे पवारांसोबत असलेले इतर लोक अतिशय क्रिमिनल होते. "१९९७ साली तत्कालीन शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास बेदरे यांच्या खुनाच्या प्रकरणात शिक्षा झालेले आणि नुकतेच सरकारने शिक्षा माफ केल्यामुळे बाहेर पडलेले लोक त्यांच्यासोबत होते. जेलमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांचे वर्तन सामान्य लोकांना धमकावणं, जिवे मारण्याच्या धमक्या देणं असंच आहे." असे त्यांनी सांगितले.
चालकामुळे वाचला जीवहा हल्ला पूर्वनियोजित होता आणि खुनाच्याच इराद्याने झाला होता, असा दावा डावकर यांनी केला. "मला त्यांनी जिवंत मारलं असतं, परंतु आमचा चालक मध्ये पडला आणि त्याने त्यांना धरलं म्हणून मी माझा जीव वाचवून कार्यालयातून पळून जाऊ शकलो. त्याच्यामुळे मी वाचलो." या दगडफेकीमध्ये त्यांचे आणखी दोन सहकारी जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत, असेही सांगितले.
खुनी वृत्तीच्या लोकांची जागा कारागृहातच"हे खुनी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांची जागा खऱ्या अर्थाने कारागृहातच आहे. केवळ राजकीय वरधास्तामुळे ते बाहेर पडलेले आहेत," अशी संतप्त भावनही डावकर यांनी व्यक्त केली. माझा कुठलाही संबंध नसताना माझ्यावर निर्घृण हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, अशा प्रवृत्तींना कारागृहात घातले पाहिजे, हीच माझी मागणी आहे, असेही त्यांनी नमूद केले. या गंभीर दाव्यानंतर पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते आणि अटकेची प्रक्रिया कधी सुरू होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Web Summary : Amar Singh Pandit's aide alleges a murder attempt during council elections. He accuses Pawar family members of the attack, claiming prior threats and criminal history. The aide survived due to his driver's intervention.
Web Summary : अमर सिंह पंडित के सहायक ने परिषद चुनावों के दौरान हत्या के प्रयास का आरोप लगाया। उन्होंने पवार परिवार के सदस्यों पर हमले का आरोप लगाया, पूर्व धमकियों और आपराधिक इतिहास का दावा किया। सहायक अपने ड्राइवर के हस्तक्षेप के कारण बच गया।