बीड पोलिसांची मान उंचावली; एका एपीआयसह दोन कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक

By सोमनाथ खताळ | Published: April 26, 2024 06:30 PM2024-04-26T18:30:23+5:302024-04-26T18:33:57+5:30

१ मे रोजी पोलिस मुख्यालयावर सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन यांचा गौरव केला जाणार आहे.

Beed police held high; Director General of Police Medal to two police including one API | बीड पोलिसांची मान उंचावली; एका एपीआयसह दोन कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक

बीड पोलिसांची मान उंचावली; एका एपीआयसह दोन कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक

बीड : जिल्हा पोलिस दलातील एका सहायक पोलिस निरीक्षकांसह दोन कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहिर झाले आहे. १ मे रोजी पोलिस मुख्यालयावर त्यांना हे पदक वितरीत केले जाणार आहे.दंगल नियंत्रण पथकाचे प्रभारी अधिकारी महादेव ढाकणे, वाहतूक शाखेचे विष्णू काकडे, दत्तात्रय दुधाळ यांचा यात समावेश आहे. 

महादेव ढाकणे यांनी जिल्ह्यात अगोदर बीड शहर पोलिस ठाणे आणि नंतर अंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर विष्णू काकडे यांनी देखील वाहतूक शाखेत उत्कृष्ट कार्य केलेले आहे. दुधाळ यांची नेमणूक जरी वाहतूक शाखेत आहे. परंतू मागील अनेक वर्षांपासून ते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. 

या तिघांनीही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यामुळेच त्यांना पदक जाहिर झाले आहे. १ मे रोजी पोलिस मुख्यालयावर सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन यांचा गौरव केला जाणार आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर आदींनी त्यांचे स्वागत केले आहे.

Web Title: Beed police held high; Director General of Police Medal to two police including one API

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.