शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Beed News: रिस्क नको म्हणून पोलिसांनी अटक टाळली, विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाचे रुग्णालयातून ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 16:11 IST

चौथीत शिक्षणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याने संतप्त पालकांनी शिक्षकास चांगलाच चोप दिला होता. जखमी शिक्षकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्याने 10 एप्रिल रोजी सकाळी रुग्णालयातून पोबारा केला.

बीड: शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिक्षणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याने संतप्त पालकांनी शिक्षकास चांगलाच चोप दिला होता. जखमी शिक्षकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यास बेदम मारहाण केल्याने स्वत:च्या पायावर चालणेही मुश्कील झाले होते. त्यामुळेच रिस्क नको म्हणून पोलिसांनी अटक केली नाही. मात्र, शिक्षकाने 10 एप्रिल रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयातून पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे. हा मोठा निष्काळजीपणा शिवाजीनगर पोलिसांच्या अंगलट आला आहे.

शाहेदखान कासम पठाण (33, रा. नायगाव, ता. पाटोदा) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित 10 वर्षीय मुलगी गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेते. 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी मधल्या सुटीनंतर शाहेदखान पठाण हा अध्यापनासाठी वर्गात आला. यावेळी त्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. त्यानंतर शिक्षक शाहेदखान कोणाला काहीही सांगू नकाे, असे बजावले. 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पीडितेच्या संतप्त नातेवाइकांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यानंतर शिक्षक शाहेद खान यास त्यांनी लाथाबुक्क्यांनी चोप दिला. 

'लोकमत'ने उपस्थित केली होती शंका

जखमी शाहेदखान यास जिल्हा रुग्णालयात वॉर्ड क्र.6 मध्ये उपचारार्थ दाखल केले होते. 10 रोजी सकाळी आठ वाजता उपचाराची कागदपत्रे खाटावर ठेऊन त्याने धूम ठोकली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पो.नि. केतन राठोड यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. दरम्यान, शाहेदखान पठाण याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती, त्यामुळे धोका नको म्हणून त्यास पोलिसांनी अटक केली नही. मात्र, त्यास नजरकैदेत ठेवता आले असते. त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी काहीच उपाय केले नाहीत, अशी शंका 'लोकमत'ने 10 रोजीच्या अंकातील वृत्तात उपस्थित केली होती, ती खरी ठरली.

पोलीस एवढे गाफील कसे....

आरोपीस उपचारादरम्यान अटक न करताही नजरकैदेत ठेवता आले असते. मात्र, अटकेऐवजी पोलिसांनी पलायनाची रिस्क घेतली. शाळेला भेट दिली, गुन्हा नोंद झाला म्हणजे ठाणेप्रमुखांची जबाबदारी संपते का, पोलीस एवढे गाफील कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, आरोपी मारहाणीत जखमी होता, त्यामुळे त्यास अटक केली नव्हती. त्याचा कुठल्याही स्थितीत शोध घेऊन अटक करण्यात येईल, अशी माहिती उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली.

टॅग्स :MolestationविनयभंगBeedबीडPoliceपोलिसTeacherशिक्षक