शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Beed Nagar Panchayat Election Updates : बीडमधील लढत मुंडे विरुद्ध मुंडे होती का?; पंकजा मुंडे म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 12:57 IST

Beed Nagar Panchayat Election Updates : बीडमध्ये एकसंध असा भाजप सोडून इतर कोणताही पक्ष नाही, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य.

"सत्ता असूनही सत्ताधारी यश मिळवण्यात कमी पडले आहेत. लोकांनी भाजपलाच (BJP) पहिली पसंती दिली. राज्यातील निकाल पाहिले. त्यातही लोकांनी भाजपलाही साथ दिली. बीडमध्येही ज्या नगरपंचायती होत्या त्यात भाजपला बहुमत मिळालंय असं चित्र स्पष्ट झालंय. बीड जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचेही मी आभार मानते," अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

यावेळी त्यांना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विरुद्ध पंकजा मुंडे (Pankaja Munde) अशी लढत होती का? असा सवाल विचारण्यात आला. "बीडमधील लढत ही तुम्ही समजता तशी नव्हती. एका मतदारसंघाचं नेतृत्व आणि जिल्ह्याचं पालकत्व यात खुप फरक आहे. बीड जिल्ह्याचं जे चित्र आहे ते गेल्या अडीच वर्षांतील कामकाजाचा राग, रोष आणि आमच्या काळातील कामावरचा विश्वास आहे. आता बीड जिल्ह्यातील लोकांनी भविष्यात काय असेल याचेच संकेत दिले आहेत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्वीटही केलं. "बीडमध्ये मिळालेला विजय आणि राज्यात ठिकठिकाणी मिळालेला विजय हा संपूर्णपणे कार्यकर्त्यांचा आहे... लढाई कड़ी है पर तैयारी और उम्मीद बड़ी है," असं त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलं.भाजप सोडला तर एकसंध पक्ष नाहीबीडमध्ये एकसंध असा भाजप सोडला तर कोणताही पक्ष नाही. प्रत्येक जण एकेका मतदारसंघाचा ठेका घेत असून जिल्ह्याच्या भविष्यासाठी कोणीही काम करत नाही. पालकमंत्रीही नाही. भाजप हाच एक पक्ष आहे जो एकसंध राहून जिल्ह्याच्या भविष्यासाठी काम करत असल्याचंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडElectionनिवडणूक