मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 11:04 AM2022-07-10T11:04:54+5:302022-07-10T11:12:49+5:30

रूई येथील रहिवासी असलेले हे दांपत्य १९८७ पासून पांडुरंगाची वारी करतात तसेच २०१२ पासून पायी वारी करत आले आहे.

beed murli nawale honor to mahapuja ashadhi ekadashi with cm eknath shinde pandharpur | मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान

मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान

Next

सखाराम शिंदे 

गेवराई (बीड) -  बीड तालुक्यातील रुई येथील मुरली बबन नवले व जिजाबाई मुरली नवले या शेतकऱ्याला रविवार रोजी मुख्यमंत्र्यांच्या समवेत पंढरपूर येथे पांडुरंगाची आरती करण्याचा व 2022 चा मानाचा वारकरी हा सन्मान मिळाला. पंढरपूर येथे गेवराई तालुक्याला पहिल्यादांच हा मान मिळाला आहे.

रूई येथील रहिवासी असलेले हे दांपत्य १९८७ पासून पांडुरंगाची वारी करतात तसेच २०१२ पासून पायी वारी करत आले आहे. त्यांना या वर्षीचा पंढरपूर येथे विठ्ठलाची आरती करण्याचा मान रविवार पहाटे मिळाला. यावेळी विठ्ठल मंदिर संस्थान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नीच्या हस्ते या दाम्पत्याला आरती करण्याचा मान मिळाला. तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते या दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. गेवराई तालुक्यातील सामान्य वारकरी शेतकऱ्याला आरतीचा मान देणारा पांडुरंग हा म्हणूनच गोर गरिबांना आपला वाटतो.

Web Title: beed murli nawale honor to mahapuja ashadhi ekadashi with cm eknath shinde pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.