बीड पालिकेत गैरकारभार; सीओसहीत सहा अधिकारी निलंबीत, नगरविकास राज्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 04:00 PM2022-03-21T16:00:16+5:302022-03-21T16:01:29+5:30

मुख्याधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कारभारावर सामान्य नागरिकांचा रोष होता.

Beed Municipality mismanagement; Six officers including CO suspended, Minister of State for Urban Development Prajakt Tanpure announced | बीड पालिकेत गैरकारभार; सीओसहीत सहा अधिकारी निलंबीत, नगरविकास राज्यमंत्र्यांची घोषणा

बीड पालिकेत गैरकारभार; सीओसहीत सहा अधिकारी निलंबीत, नगरविकास राज्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext

बीड : येथील नगर पालिकेतील गैरकारभार, अधिकाऱ्यांची मुजोरी, भ्रष्टाचार आदी आरोपांचा ठपका ठेवून बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, जिल्हा प्रशासन अधिकारी निता अंधारे यांच्यासह सहा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सभागृहात घोषणा केली. आ.विनायक मेटे यांनी यासंदर्भात लक्षवेधी केली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाच्या सामान्य प्रशासन अधिकारी निता अंधारे, बीड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, पाणी पुरवठा अभियंता राहुल टाळके, कर अधीक्षक सुधीर जाधव, कनिष्ठ रचना सहायक सलिम सय्यद याकूब व बांधकाम अभियंता योगेश हाडे अशी निलंबन झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. बीड पालिका मागील अनेक महिन्यांपासून वादात सापडली आहे. मुख्याधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कारभारावर सामान्य नागरिकांचा रोष होता.

भर पावसाळ्यातही केवळ ढिसाळ नियोजनामुळे बीडकरांना १५ दिवसाला पाणी मिळाले. तसेच अमृत पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजनेच्या कामात अनियमितता झाली. बीडकरांना अशुद्ध पाणी पुरवठा, खराब रस्ते, धुळ आदी समस्या गंभीर बनल्या होत्या. यावरच विधानपरिषद सदस्यांनी लक्षवेधी केली. यावर नगरविकास राज्यमंत्री तणपुरे यांनी या सर्वांना निलंबीत करत असल्याची घोषणा केली. रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाला याबाबत अधिकृत आदेश प्राप्त झाले नव्हते, परंतू घोषणा केल्याने ही कारवाई अटळ आहे.

 

Web Title: Beed Municipality mismanagement; Six officers including CO suspended, Minister of State for Urban Development Prajakt Tanpure announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.