शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Beed: मुलगी कशी काय झाली, म्हणत विवाहितेला मारहाण; पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:43 IST

वडवणी तालुक्यातील घटना

बीड : तुला मुलगी कशी काय झाली, असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर, चारित्र्यावर संशय घेतला. घर बांधायला पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेचा छळ केला. हा प्रकार वडवणी तालुक्यात घडला. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ऐश्वर्या चोले (२२) हिचे वडवणी तालुक्यातील खडकी येथील सिद्धेश्वर चोलेसोबत २०२२ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर, वर्षभर सासरच्या लोकांनी तिला सुखाने नांदविले; परंतु नंतर तिला त्रास सुरू झाला. वर्षभरानंतर तिला एक मुलगी झाली. मग तिला आणखीनच त्रास सुरू झाला. तुला मुलगीच कशी झाली, असा प्रश्न उपस्थित करत, तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. तिचा उपाशीपोटी शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. त्यानंतर, आपल्याला घर बांधायचे आहे. तुझ्या आई-वडिलांकडून पाच लाख रुपये आणि सोने घेऊन ये, असे म्हणून सासरचे लोक वारंवार त्रास देत असत. हा त्रास सहन न झाल्याने ऐश्वर्याने आई-वडिलांना फोन करून सांगितले. त्यानंतर तिचे चुलते ऐश्वर्याच्या घरी आले. त्यांना समजावून सांगितल्यानंतर दोन-चार महिने चांगले नांदविले. परत घर बांधायला पैसे आणि सोने घेऊन ये, म्हणून त्रास द्यायला सुरुवात झाली. त्यानंतर, तिला मारहाणही करण्यात आली. या प्रकरणी पती सिद्धेश्वर एकनाथ चोले, सासू किसकिंदा एकनाथ चोले, सासरा एकनाथ गणपती चोले, भाया कैलास एकनाथ चोले यांच्याविरोधात वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावाच्या लग्नात केली मारहाणऐश्वर्याच्या भावाचे लग्न १३ मे रोजी होते. त्यासाठी एक दिवस आधीच ती माहेरी आली. त्यानंतर, १३ मे रोजी विवाहस्थळी गेली. लग्नानंतर लगेच तू आताच माझ्यासोबत चल, असे म्हणत पती सिद्धेश्वर चोलेने ऐश्वर्याला मारहाण केली. तू आताच जर घर बांधायला पैसे आणि सोने घेऊन यायचे, नाहीतर तू आमच्या घरी यायाचे नाही, असे म्हणून ऐश्वर्याला तेथेच सोडून निघून गेले. त्यानंतरही ऐश्वर्याने आज ना उद्या येतील, या आशेवर राहिली; परंतु काेणीच न आल्याने तिने वडवणी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या