बीडमध्ये गावठी कट्टा, तीन जीवंत काडतुस बाळगणाऱ्या तरुणास बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 17:36 IST2019-04-13T17:30:45+5:302019-04-13T17:36:21+5:30
सापळा लावून त्यास ताब्यात घेतले.

बीडमध्ये गावठी कट्टा, तीन जीवंत काडतुस बाळगणाऱ्या तरुणास बेड्या
बीड : शहरातील चऱ्हाटा फाटा येथे बेकायदेशीररित्या गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या तरुणास विशेष पथकाने शुक्रवारी रात्री पकडले. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याकडून तीन जीवंत काडतुसही जप्त करण्यात आले आहेत.
गणेश भागवत गिरी (२८, रा. चऱ्हाटा फाटा, बीड) असे आरोपीचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बेकायदेशीर शस्त्रांवर पोलिसांची नजर आहे. चऱ्हाटा फाट्यावर एक तरुण गावठी कट्ट्यासह उभा असल्याची माहिती पोउपनि रामकृृष्ण सागडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांसह सापळा लावून त्यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे असा ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर पो.ना. पांडुरंग देवकते यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला. फौजदार बालाजी ढगारे अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोउपनि रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, अंकुश वरपे, गणेश नवले, रेवननाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.