बीडमध्ये वकिलास मारहाण करून दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:18 IST2018-02-22T00:17:36+5:302018-02-22T00:18:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरातील संत नामदेव नगर भागातील अॅड.अरविंद सुधाकरराव पाटील या वकिलास टाँबीने मारहाण करून घरातील ...

बीडमध्ये वकिलास मारहाण करून दागिने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील संत नामदेव नगर भागातील अॅड.अरविंद सुधाकरराव पाटील या वकिलास टाँबीने मारहाण करून घरातील सोन्या चांदीच्या दागिने व इतर ऐवज लंपास केल्याची घअना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, चोरट्यांच्या हल्ल्यात वकिलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. वाढत्या चोºया आणि दरोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अॅड.पाटील हे बीड न्यायालयात कार्यरत आहेत. रात्री कुटुंबासमवेत जेवण करून ते झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास पाठीमागच्या दारातून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्या अरविंद पाटील यांना उठवून टाँबीने मारहाण केली. तसेच सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रकमेची माहिती घेत ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मारहाणीत जगताप यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.
या प्रकरणी अरविंद पाटील यांनी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.