शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील गुंदा वडगाव, गोविंदवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 19:21 IST

माजी सैनिकाची बंदुक तर शेतकऱ्याचे पावणे दोन लाख लंपास

बीड : बीड तालुक्यातील गुंदा वडगाव व गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे चोरट्यांनी शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला. माजी सैनिकाची बंदुकीसह एका शेतकऱ्याचे तब्बल पावणे दोन लाख रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या चोऱ्यांमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे श्रीकिसन राम कदम या शेतकऱ्याच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरटे घरात शिरले. कपाट तोडून रोख १ लाख, एक मोबाइल व दागिने असा पावणे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार सकाळी समजला. कदम यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद असून तपास फौजदार विठ्ठल काळे करत आहेत. त्यानंतर गोविंदवाडीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख फौजदार रामकृष्ण सागडे यांनीही भेट दिली.  

दुसरी चोरी गुंदा वडगाव येथे घडली. किसनदेव लक्ष्मण डोंगरदिवे या माजी सैनिकाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. ८ दिवसांपासून गावाकडील घराला कुलूप लावून ते बीडमध्ये राहत होते. चोरांनी  बंद घर हेरुन शुक्रवारी मध्यरात्री कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांच्या हाती त्यांची बंदूक लागली. त्यातील काडतूस डोंगरदिवे यांच्याकडे होते. त्यामुळे रिकामी बंदूक घेऊन चोरांनी पळ काढला.

तसेच याच गावातील दादासाहेब रामकिसन मुंडे यांच्या घरात चोरी केली. कुटूंबीय झोपलेल्या खोलीला बाहेरून कड्या लावत चोरट्यांनी दुसऱ्या खोलीत ठेवलेला जवळपास ५३ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पहाटे दीड वाजता पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक श्रीकांत उबाळे, सहायक फौजदार एस. आर. बळवंते, पोहेकॉ बालासाहेब सुरवसे, एस. पी. खरमाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा नोंद असून तपास फौजदार श्रीराम काळे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीसPoliceपोलिस