शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बीड जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरण: मुख्य आरोपी प्रदीप फाटे ४० दिवसांनंतर पुणे येथून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:22 IST

GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला वरिष्ठ अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

बीड: संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या वस्तू व सेवाकर (GST) विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याला पुणे येथील वाघोली परिसरातून मंगळवारी अटक करण्यात आली आहे. गेल्या ४० दिवसांपासून फाटे फरार होता.

मानसिक छळ आणि बेकायदेशीर कामांचा दबावसचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी दिलेल्या जबाबानुसार, प्रदीप फाटे हे अतिरिक्त पदभाराचा गैरवापर करून सचिन यांचा सतत मानसिक छळ करत होते. कार्यालयात त्यांचा वारंवार अपमान करणे आणि काही विशिष्ट कंपन्यांची बेकायदेशीर कामे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मयुरी यांनी केला आहे. याच छळाला कंटाळून सचिन जाधवर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अशी घडली होती घटना१६ जानेवारी २०२६ रोजी सचिन जाधवर कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते, मात्र ते परतले नाहीत. १७ जानेवारी रोजी मांजरसुंबा घाटातील कपिलधारवाडी फाट्याजवळ त्यांच्याच कारमध्ये त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. यानंतर २३ जानेवारी रोजी प्रदीप फाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची धडक कारवाईगुन्हा दाखल झाल्यापासून फाटे फरार झाला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. आरोपीला अटक होत नसल्याने जाधवर यांच्या कुटुंबीयांनी २५ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणही केले होते. अखेर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फाटे पुण्यात असल्याची माहिती मिळवली आणि वाघोलीत छापा टाकून त्याला जेरबंद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed GST Officer Death: Main Accused Arrested After 40 Days

Web Summary : Pradeep Phate, the main accused in the suicide of Beed GST officer Sachin Jadhav, was arrested in Pune after 40 days on the run. He is accused of mental harassment and pressuring Jadhav for illegal work, leading to the tragic suicide.
टॅग्स :GST Officeमुख्य जीएसटी कार्यालयCrime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या