शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:33 IST

खासदार बजरंग सोनवणे यांचा दौरा वादात!

बीड: परतीच्या पावसामुळे आणि पैठणच्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहेत. घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले असून, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. मात्र, बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या दौऱ्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

पूरग्रस्त भागात होडीवरुन दौरा

खासदार बजरंग सोनवणे यांनी मंगळवारी माजलगाव तालुक्यातील काळेगावथडी, डुब्बाथडी, कवडगावथडी, पुरुषोत्तमपुरी, रिधोरी, हिवरा अशा गावांना भेट दिली. पाणी शिरलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते गेले असता, त्यांनी थर्माकॉलच्या होडीवर बसून परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते मोहन जगताप आणि एक कार्यकर्ताही होडीवर बसलेला दिसला.

गावकरी पाण्यात, खासदार होडीत

यावेळी गावातील चार-पास तरुण मानेपर्यंत पाणी साचलेल्या भागातून होडी ओढत होते, तर खासदार सोनवणे व इतर नेते आरामात होडीवर बसलेले दिसले. पाणी जास्त असल्यामुळे खासदार खाली उतरले नाहीत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आपले पांढरे कपडे खराब होऊ नयेत, म्हणून खासदार सोवनणे पाण्यात उतरले नाहीत, अशी त्यांच्यावर टीका होत आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी गेले की स्वतःच्या सोयीसाठी? असा सवाल उपस्थित केला जातोय. काहींनी तर याला “फोटोशूट दौरा” असेही म्हटले आहे. 

शेतकऱ्यांची नाराजी

पूरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदतीची अपेक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर खासदारांचा असा होडी प्रवास आणि फोटोसेशनमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दौऱ्यात खासदार सोनवणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासन दरबारी आवाज उठवू, असे आश्वासन दिले. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : MP's boat ride amid flood irks villagers; video goes viral.

Web Summary : MP Bajrang Sonawane's boat tour of flood-hit areas sparked controversy. Villagers waded through water while he rode, drawing criticism for prioritizing his comfort over empathy. Farmers expressed anger over lack of assistance.
टॅग्स :BeedबीडfloodपूरMember of parliamentखासदारmajalgaon-acमाजलगांवNCPराष्ट्रवादी काँग्रेस