शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 08:03 IST

Beed Farmer Suicide News: गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील शेतकऱ्याने कष्टाचे नऊ लाख रुपये गेवराईतील छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठेवले, पण...

बीड: गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील शेतकऱ्याने कष्टाचे नऊ लाख रुपये गेवराईतील छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठेवले होते. त्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी अनेकदा खेटे मारले. मंगळवारी दोघे नवरा-बायको दिवसभर कार्यालयाबाहेर बसले. पण, एक रुपयाही मिळाला नाही. रात्री पत्नी मल्टिस्टेटमध्येच झोपली, तर पतीने बुधवारी पहाटे मल्टिस्टेटच्या समोरच गळफास घेत आत्महत्या केली.

सुरेश आत्माराम जाधव (वय ४६, रा. खळेगाव, ता. गेवराई) या शेतकऱ्याने २०२० साली छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ११ लाख ५० हजार रुपये ठेवले होते. मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम काढण्यासाठी सुरेश जाधव हे गेल्या दोन वर्षापासून मल्टिस्टेटमध्ये चकरा मारत होते. मात्र, त्यांना पैसे दिले नाहीत. वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्याने सुरेश जाधव यांनी बुधवारी पहाटे टोकाचे पाऊल उचलल्याची फिर्याद पत्नी कविता यांनी पोलिसांत दिली.

दोन मुलांसह नवरा-बायको दिवसभर ताटकळलेपैशांसाठी सुरेश जाधव, पत्नी कविता, मुलगी साक्षी व मुलगा शुभम हे दिवसभर मल्टिस्टेटमध्येच बसून होते. रात्री कविता या तेथेच झोपल्या. तर सुरेश जाधव हे मुलांसोबत घरी गेले. सुरेश जाधव हे पहाटे ३ वाजेच्या सुमारास परत आले आणि त्यांनी मल्टिस्टेटसमोरील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस आल्यावर त्यांनी शटर वाजवून कविता यांना उठविले. पतीला लटकलेले पाहून त्यांनी हंबरडा फोडला.

६ महिन्यांपूर्वीही एकदा प्रयत्नसाधारण सहा महिन्यांपूर्वीही पैशांसाठी सुरेश जाधव यांनी विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चेअरमन संतोष भंडारी यांनी त्यांना २ लाख ५० हजार रुपये दिले. उर्वरित २ लाख रुपये दोन महिन्यांत देतो म्हणाले होते.

संतोष भंडारीविरोधात गुन्हा दाखलछत्रपती मल्टिस्टेटचा चेअरमन संतोष ऊर्फ नाना बसंता भंडारी याच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद कविता जाधव यांनी गेवराई पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक लंके हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रBeedबीडgeorai-acगेवराईfarmer suicideशेतकरी आत्महत्या