शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

बीड: आमदारांचे घराणे! मुंडे अन् पंडित सर्वात पुढे; क्षीरसागर, सोळंकेही प्रत्येकी ६ वेळा आमदार

By सोमनाथ खताळ | Updated: October 22, 2024 12:15 IST

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत तरी घराणेशाही स्पष्ट दिसून आली आहे

सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत तरी घराणेशाही स्पष्ट दिसून आली आहे. परळीचे मुंडे, गेवराईच्या पंडित घराण्यातच आतापर्यंत सार्वाधिक आमदार राहिले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही घरांमध्ये मंत्रिपदे आलेली आहेत. त्या पाठोपाठ बीडचे क्षीरसागर आणि माजलगावचे सोळंके कुटुंबही मागे नाही. यांनीही आमदारकीसह मंत्रिपद मिळविलेले आहे.

१९६२ नंतर ८९ आमदार झाले आहेत. यामध्ये १० महिलांना संधी मिळाली. इतर सर्व पुरुष आमदार राहिलेले आहेत. यात सर्वांत अव्वल क्रमांकावर परळीचे मुंडे कुटुंब आहे. त्यांनी परळी आणि रेणापूर अशा दोन मतदारसंघांतून आठ वेळा गुलाल उधळला आहे. गेवराईच्या पंडितांनीही ७ वेळा गुलाल उधळत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

मुंदडा सलग ५ वेळा आमदार

केज मतदारसंघातून विमल मुंदडा या सलग पाच वेळा आमदार झालेल्या आहेत. यामध्ये त्यांनी आरोग्यमंत्रिपदही सांभाळले होते. त्यानंतर, २०१९ मध्ये त्यांची सून नमिता मुंदडा आमदार झाल्या व आता दुसऱ्यांदा त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

कोणत्या कुटुंबात किती आमदार झाले?

  • गेवराई: पवार कुटुंब - ४, पंडित कुटुंब - ७
  • माजलगाव: सोळंके कुटुंब - ५
  • बीड: क्षीरसागर कुटुंब - ३
  • चौसाळा: क्षीरसागर कुटुंब - ३
  • आष्टी: धस कुटुंब - ३, धोंडे कुटुंब - ४
  • केज: मुंदडा कुटुंब - ६, सोळंके कुटुंब - १
  • परळी: मुंडे कुटुंब - ३
  • रेणापूर : मुंडे कुटुंब - ५

चार वेळा आमदार, दोन वेळा खासदार

  • गोपीनाथ मुंडे हे रेणापूर मतदारसंघातून १९८० साली पहिल्यांदा आमदार झाले. दुसऱ्या टर्मला पंडितराव दौंड आमदार झाले. त्यानंतर सलग ४ वेळा मुंडे आमदार राहिले. 
  • २००९ नंतर परळीतून मुलगी पंकजा मुंडे सलग दोन विजय मिळविले. २०१९ साली त्यांचा पराभव, तर धनंजय मुंडे विजयी झाले.
  • २००९ सालीच गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले.
  • २०१४ मध्येही त्यांनी विजय मिळविला. त्यांना केंद्रीय मंत्रिपदही मिळाले. दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे डॉ. प्रीतम मुंडे खासदार झाल्या.
  • २०१९ मध्येही डॉ. मुंडेच खासदार होत्या. २०२४ ला पंकजा यांना संधी मिळाली, परंतु बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे