एसटी महामंडळाचा बीड विभाग राज्यात प्रथम
By अनिल भंडारी | Updated: August 31, 2023 18:23 IST2023-08-31T18:22:47+5:302023-08-31T18:23:04+5:30
भौतिक आणि आर्थिक मापदंड विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग आणि आगारांचे घटक श्रेणीकरण करण्यात येते.

एसटी महामंडळाचा बीड विभाग राज्यात प्रथम
बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील विभाग आणि आगारांच्या विविध घटकांच्या श्रेणीकरणात जुलै महिन्यात बीड विभागाला ८४ गुण मिळाले असून या विभाग महामंडळ स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
भौतिक आणि आर्थिक मापदंड विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग आणि आगारांचे घटक श्रेणीकरण करण्यात येते. त्यानुसार मुख्य सांख्यिकीय अधिकाऱ्यांनी जुलै २०२३ मधील विविध घटकांच्या फलनिष्पत्तीनुसार श्रेणीकरण केले. त्यानुसार बीड विभागास ८४ गुण प्राप्त झाल्याचे व जुलैमध्ये विभागास महामंडळ स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ३० ऑगस्ट रोजी पत्राद्वारे कळवून सर्व अधिकारी, कर्मचारी चालक वाहकांचे स्वागत केले.