शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बीड जिल्ह्यात हजारामागे ३० तरूण नैराश्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:24 IST

कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे.

ठळक मुद्देकौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा आदी कारणांचा समावेश; हेल्पलाईनचीही होते मदत

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. आतापर्यंत अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यात प्रेरणा प्रकल्पाला यश आले आहे. तरूणांबरोबरच शेतकरी व इतर नैराश्यात असलेल्या रुग्णांना प्रेरणा प्रकल्पात समुपदेशन करून उपचार केले जात आहेत.प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्येक तीन महिन्याला आशा स्वयंसेविकांमार्फत सर्व्हेक्षण केले जाते. प्रत्येकाच्या घरी जात त्यांच्या घरात किती लोक तणावाखाली आहेत, याची माहिती घेतली जाते. जे लोक तणावात आहेत, अशांना तात्काळ १०४ या क्रमांकावर संपर्क करून देत त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण, उप जिल्हा व शेवटी जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर सदरील रुग्णाला तणावग्रस्त घोषित करुन त्यावर आवश्यक ते उपचार करुन त्याचे मनपरिवर्तन केले जाते.

शेतकरीही तणावाखालीऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात एक लाखामागे २३४ शेतकºयांना (२०१७ ची आकडेवारी) नैराश्याच्या विळख्यात अडकलेले आहेत.या शेतक-यांचेही समुपदेशन करून त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत.

आष्टी तालुक्यात सर्वाधिक संख्याआष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ८५ रूग्ण तणावग्रस्त आढळून आले आहेत.त्यापाठोपाठ अंबाजोगाई (४९) अािण शिरूरकासार (२३) या तालुक्यांचा क्रमांक लागतो.बीड, धारूर, केज, माजलगाव, परळी, पाटोदा व वडवणी येथे एकही तीव्र नैराश्यात असलेला रूग्ण नसल्याचा अहवाल आशा स्वयंसेविकांनी प्रेरणा प्रकल्पाला दिला आहे.

२० ते ३० वर्षांतील तरुणांमध्ये सर्वाधिक नैराश्यनैराश्यात असलेले सर्वाधिक तरूण हे २० ते ३० वयोगटातील आहेत. तसेच मागील काही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल आणि पुढील प्रवेशासाठी होणारी अडवणूक यामुळे काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी प्रकरणे येताच प्रेरणा प्रकल्पाकडून कुटुंब व पीडितांची तात्काळ भेट घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना आत्महत्येपासूनदूर करण्यामध्ये यश आले आहे.

तो म्हणतो.. आता आत्महत्या नको रे बाबा...साधारण महिन्यापूर्वी एक रुग्ण या प्रकल्पात आला होता. सैन्य दलात भरती होण्याची त्याची इच्छा होती. परंतु घरच्यांनी नकार दिला. यामुळे त्याने रागाच्या भरात काचेने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर लगेच त्याचे समुपदेशन करण्यासाठी प्रेरणा प्रकल्पाची टीम पोहोचली. मुलासह त्याच्या कुटूंबियांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याचा पाठपुरावाही केला. आज तोच तरूण रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाबद्दल पश्चाताप करीत आहे. आता आत्महत्या करणार नाही, असे तो सांगत आहे. अशाच अनेक तरूणांचे मनपरिवर्तन करण्यात पे्ररणाच्या टिमला यश आले आहे.ग्रामीणपेक्षा शहरात प्रमाण आधिकग्रामीण भागात १०० मागे दोन ते तीन तरूण नैराश्यात आहेत. शहरात १०० मागे तीन ते चार तरूण नैराश्यग्रस्त असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.ही टिम घेतेय परिश्रमजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरिदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल आॅफिसर सुदाम मोगले, डॉ. मोहंमद मुजाहेद, समुपदेशक अशोक मते, सामाजिक कार्यकर्ता अंबादास जाधव, परिचारिका प्रियंका भोंडवे, शीतल टाक, लेखापाल महेश कदम ही टीम या प्रकल्पात कार्यरत आहेत. समुपदेशन, उपचार आणि सर्व्हेक्षणाचा आढावा हे करीत आहेत. सध्या त्यांचे काम उत्कृष्ट सुरू आहे.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा