शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बीड जिल्ह्यात तीन टक्क्यांनी मतदान घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:39 PM

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी जवळपास ३ टक्क्यांनी घसरली आहे.

ठळक मुद्देउद्या मतमोजणी : गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज मतदारसंघात टक्का घसरला; केवळ परळीत २ टक्क्यांनी वाढला

बीड : बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी जवळपास ३ टक्क्यांनी घसरली आहे. गेवराई मतदारसंघात सर्वाधिक ७४.०८ टक्के, तर सर्वांत कमी मतदान केजमध्ये ६३.०३ टक्के झाले आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात ७१ टक्के मतदान झाले होते. यावेळी ही टक्केवारी ६८ पर्यंत घसरली आहे.जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्या ठिकाणी तुल्यबळ लढत झाली, त्या मतदारसंघात म्हणजे गेवराई आणि परळीत मतदान तुलनेत चांगले झाले आहे. गेवराईमध्ये २०१४ मध्ये ७५ टक्के मतदान झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित, भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बदामराव पंडित यांच्यात कडवी लढत झाली. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक टक्केवारी म्हणजे ७४.०८ गेवराईमध्ये आहे. असे असले तरी २०१४ च्या तुलनेत ही टक्केवारी १ टक्क्याने घसरली आहे. गेवराईत ३ लाख ५२ हजार १९२ मतदार होते. यात १ लाख ८५ हजार ७१७ पुरुष, तर १ लाख ६६ हजार ४७४ महिला मतदार आणि एक तृतीयपंथी होता. यापैकी १ लाख ४० हजार २२० पुरुष आणि १ लाख २० हजार ६७१ महिला असे एकूण २ लाख ६० हजार ८९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७५ टक्के मतदान झाले होते. यापैकी ७४.०८ टक्के मतदान झाले.माजलगावात ३ लाख ३१ हजार १६० मतदार होते. यात १ लाख ७५ हजार २७६ पुरुष तर १ लाख ५५ हजार ८८४ महिला मतदार होते. यापैकी १ लाख २३ हजार ३४९ पुरुष आणि १ लाख ४ हजार ३०८ महिला असे एकूण २ लाख २७ हजार ६५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ६८.७५ टक्के येते. २०१४ मध्ये ७३ टक्के मतदान झाले होते. यावेळी ४.२५ टक्के मतदार घसरले आहेत. माजलगावमध्ये भाजपाचे रमेश आडसकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके यांच्यात तुल्यबळ लढत झाली.बीडमध्ये ३ लाख ३५ हजार १५० मतदार होते. यात १ लाख ७८ हजार ७६८ पुरुष तर १ लाख ५६ हजार ३७९ महिला मतदार होते. याशिवाय ३ तृतीयपंथी मतदार होते. यापैकी १ लाख २० हजार ५९० पुरुष आणि ९८ हजार ९०९ महिला व एक तृतीयपंथी असे एकूण २ लाख १९ हजार ५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ६५.४९ टक्के आहे. २०१४ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघातही साडेतीन टक्क्यांनी मतदान घसरले आहे. बीडमध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यामध्ये मुख्य लढत झाली.आष्टीमध्ये ३ लाख ७० हजार ४५० मतदार होते. यात १ लाख ९६ हजार ८५४ पुरुष, तर १ लाख ७३ हजार ५९६ महिला मतदार होते. पैकी १ लाख ३० हजार ५४७ पुरुष, तर १ लाख ८ हजार ५२६ असे एकूण २ लाख ३९ हजार ७३ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ६४.५४ टक्के आहे. २०१४ मध्ये ही टक्केवारी ७३ टक्के होती. या मतदारसंघातही २०१४ च्या तुलनेत साडेआठ टक्क्यांनी टक्केवारी घसरली आहे. आष्टीमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे आणि भाजपातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले बाळासाहेब आजबे यांच्यात लढत झाली. सुरुवातीला सोपी वाटणारी लढत शेवटच्या दोन दिवसांत अतिशय तुल्यबळ अशी झाली आहे.केजमध्ये १ लाख ८९ हजार ३७० पुरुष आणि १ लाख ७२ हजार २३३ महिला व एक तृतीयपंथी असे एकूण ३ लाख ६१ हजार ७०४ मतदार होते. यापैकी १ लाख २२ हजार ७१६ पुरुष, १ लाख ५ हजार २५८ महिला आणि एक तृतीयपंथी असे एकूण २ लाख २७ हजार ९७५ मतदान झाले. ही टक्केवारी ६३.०३ टक्के आहे. या ठिकाणीही २०१४ च्या ६६ टक्क्यांच्या तुलनेत मतदान ३ टक्क्यांनी कमी झाले आहे. केजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली असतानाही नमिता मुंदडा या भाजपाच्या तिकिटावर उभ्या राहिल्या. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांच्यासोबत झाली. इतरही उमेदवार रिंगणात होते.परळी विधानसभा मतदारसंघात १ लाख ६० हजार ८३३ पुरुष, १ लाख ४५ हजार ३७१ महिला असे एकूण ३ लाख ६ हजार २०४ मतदार होते. यापैकी १ लाख १९ हजार ५४१ पुरुष, १ लाख ३ हजार ७५९ महिला असे एकूण २ लाख २३ हजार ३०० मतदारांनी मतदान केले. २०१४ च्या ७१ टक्क्यांच्या तुलनेत यावेळी २ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. परळीत ७२.९३ टक्के मतदान झाले आहे. परळीमध्ये ग्रामविकासमंत्री भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात काट्याची टक्कर होती. आरोप-प्रत्यारोपांमुळे परळी मतदारसंघातील प्रचारामध्ये रंगत निर्माण झाली होती.बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २० लाख ५६ हजार ८६० मतदारांपैकी १३ लाख ९८ हजार ३९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १० लाख ८६ हजार ८१८ पुरुष मतदारांपैकी ७ लाख ५६ हजार ९६३ जणांनी मतदान केले. ९ लाख ७० हजार ३७ महिला मतदारांपैकी ६ लाख ४१ हजार ४३१ महिला मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यात एकूण ५ तृतीयपंथी मतदार होते. त्यापैकी बीडमध्ये १ आणि केजमध्ये १ अशा दोघांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी दिवसभर सर्वच मतदारसंघात निवडून कोण येणार? जिल्ह्यात, राज्यात कोणाला किती जागा येणार? यावर लोक चर्चा करीत होते. सोशल मीडियाचाही वापर करीत होते.विधानसभा निवडणुकीत धावल्या २६२ बसेसबीड : विधानसभा निवडणुकीत कर्मचारी, मतपेट्यांना ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या २६२ बसेस जिल्ह्यातील सहा मतदार संघात धावल्या. दोन दिवसाचे रापमला जवळपास ७० लाख रूपये उत्पन्न मिळणार आहे.२१ आॅक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी मतनपेट्या जमा करण्यासाठी प्रशासनाने तब्बल २६२ बसेस आरक्षित केल्या होत्या. या दोन दिवसाचे रापमला अंदाजे ७० लाख रूपये उत्पन्न मिळणार आहे.तसेच काही बस गाड्यामध्ये कर्मचाऱ्यांना सोडल्यानंतर प्रवाशी वाहतूकही केल्याने उत्पन्नात आणखी भर पडणार आहे. बीड मतदार संघात ३७, गेवराई ४६, माजलगाव ४७, परळी २७, केज ४४ आणि आष्टीमध्ये ६१ बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. ही माहिती वाहतूक अधीक्षक हर्षद बनसोडे यांनी दिली. वाहतूक निरीक्षक संतोष महाजन यांनी या बसगाड्यांचे नियोजन केले होते.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान