एअर सर्जिकल स्ट्राईकनंतर बीड जिल्ह्यात जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:27 IST2019-02-27T00:26:21+5:302019-02-27T00:27:53+5:30
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर सर्जिकल स्ट्राईकचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात आले. बीड शहरात नगर रोड, सुभाष रोड, माळीवेस, पेठ भागात फटाके फोडून तरूणांनी भारतमातेचा जयघोष करत भारतीय जवानांना सॅल्यूट केला.

एअर सर्जिकल स्ट्राईकनंतर बीड जिल्ह्यात जल्लोष
बीड : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर सर्जिकल स्ट्राईकचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात आले. बीड शहरात नगर रोड, सुभाष रोड, माळीवेस, पेठ भागात फटाके फोडून तरूणांनी भारतमातेचा जयघोष करत भारतीय जवानांना सॅल्यूट केला.
परळीत राणी लक्ष्मीबाई टॉवर, शिवाजी चौकासह अन्य ठिकाणी साखर वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. ‘भारत माता की जय’, ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.
आष्टी येथे शिवाजी चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. जिल्ह्यात इतर ठिकाणीही जल्लोष करण्यात आला तर सोशल मिडीयावर भारतीय सैन्याचा गौरव करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या.