शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बीड जिल्हा बँक घोटाळा : माजी मंत्री, आमदारांसह २८ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:57 AM

गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकित कर्ज व कर्जापोटी तारण दिलेल्या काही जमिनींची परस्पर विक्री करून बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित व तत्कालीन २८ संचालकांवर गेवराई पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

गेवराई (जि. बीड) : गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकित कर्ज व कर्जापोटी तारण दिलेल्या काही जमिनींची परस्पर विक्री करून बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित व तत्कालीन २८ संचालकांवर गेवराई पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.तत्कालीन २८ संचालकांनी जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या नावाने कर्ज मिळविण्यासाठी जिल्हा बँकेस बनावट कागदपत्रे सादर करून, १४ कोटी रुपयांचे कर्जही मिळविले. बँकेने गहाणखत करून घेण्यासाठी कारखान्याकडे तगादा लावल्याने, निपाणी जवळका येथील १ हेक्टरचे गहाणखत २०१३मध्ये करून दिले होते. बँकेची थकबाकी असताना, ती जमीन मनोहर शिवाजी काकडे यांनापरस्पर विकून बँकेची फसवणूक केली.जयभवानी साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी मोलॅसीस व स्पिरिटचा साठा नजर तारण ठेवला होता. असे असतानासुद्धा त्याची परस्पर विक्री केली. साखर कारखान्याच्या मालकीची जमीन राष्टÑीय महामार्ग क्र. २११च्या चौपदरीकरणासाठी शासनाने संपादित केली होती. त्यापोटी ४ कोटी ६३ लाख ७५ हजार २६८ रुपयांचा मावेजा मिळाला होता. ही रक्कम कारखान्याच्या खात्यात न टाकता बँकेच्या इतर खात्यांत जमा करण्यात आली, तसेच जिल्हा बँकेने २००५पासून कारखान्याने मागणी केल्यानुसार वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज दिले होते, परंतु यापैकी एकाचाही ठोस पुरावा बँकेकडे देण्यात आला नाही. खतासाठी कर्ज घेतले व ते कुणाला वाटले, याची कारखान्याने माहिती दिली नाही.३९ कोटींचा अपहारया साखर कारखान्यासाठी मंजूर झालेले कर्ज १४ कोटी ५७ लाख व त्यावरील व्याज २४ कोटी ४३ लाख असे एकूण ३९ कोटी एवढ्या रकमेचा अपहार केल्याची तक्रार, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अकृषी कर्ज व वसुली विभागाचे सहायक व्यवस्थापक आसाराम पिराजी सुर्वे यांच्या फिर्यादीवरून २८ जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यांच्यावर गुन्हा दाखलचेअरमन जयसिंह शिवाजीराव पंडित, व्हाइस चेअरमन पाटीलबा रंगनाथराव मस्के, माजी मंत्री शिवाजीराव अंकुशराव पंडित, राष्टÑवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमरसिंह शिवाजीराव पंडित, दत्तात्रय यादवराव येवले, शिवाजीराव भीमराव वावरे, अनिरुद्ध सोपानराव लोंढे, श्रीराम विठ्ठलराव आरगडे, भागवतराव सखाराम वेताळ, अशोकराव कैलासराव थोपटे, बप्पासाहेब लक्ष्मणराव तळेकर, राजेसाहेब त्र्यंबकराव पवळ, शिवाजीराव उत्तमराव नावडे, शेख शब्बीर शेख मेहबूब पटेल, अप्पासाहेब शिवदास खरात, रमेशलाल मारोतराव जाजू, केशवराव भाऊसाहेब औटी, प्रेमचंद नारायण गायकवाड, विठ्ठलराव जाणुजी शेळके, पंडितराव जनार्दन खेत्रे, कुमारराव गोविंदराव ढाकणे, मदनराव रामराव घाडगे, शोभाबाई भगवानराव चव्हाण, महानंदाबाई वैजनाथराव चाळक, सुमनबाई विठ्ठलराव गोरडे, शेषेराव पांडुरंगराव सानप, एस.एन. जोशी, अशोक दिगांबर पानखडे.

टॅग्स :bankबँकCrimeगुन्हा