गेवराई (बीड): संकटकाळात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अहोरात्र सज्ज असलेल्या 'डायल ११२' या आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांना विनाकारण त्रास देऊन त्यांना उलट उत्तरे देणाऱ्या कुंभारवाडी येथील प्रदोष गंगाधर जाधव या तरुणाची न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली आहे.
नेमका काय घडला प्रकार? ३० जानेवारी रोजी रात्री १०:२० च्या सुमारास प्रदोषने डायल ११२ वर फोन केला आणि मादळमोही येथील एका ट्रेडिंग कंपनीत सोने-चांदीची मोठी चोरी झाल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक राजभाऊ गर्जे आणि त्यांचे पथक तातडीने कामाला लागले. मात्र, जेव्हा पोलिसांनी त्याला पत्ता विचारण्यासाठी पुन्हा संपर्क केला, तेव्हा त्याने मुजोरपणे उत्तर दिले की, "काही चोरी झाली नाही, फक्त तुम्हाला कामाला लावण्यासाठी फोन केला होता."
धमकी दिली अन् कोठडीत गेला! माहिती खोटी असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपीचा उद्दामपणा इथेच थांबला नाही. त्याने पोलिसांना "तुम्ही कशी नोकरी करता तेच बघतो" अशी धमकीही दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याला विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात केली आहे.
कठोर कारवाई करणारपोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी इशारा दिला आहे की, अशा खोट्या माहितीमुळे खरं संकट असलेल्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचायला पोलिसांना उशीर होऊ शकतो, त्यामुळे यापुढेही अशा प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
Web Summary : A Beed youth pranked police with a fake robbery call to 'Dial 112'. Angered by his arrogance and threats, police arrested him. He is now jailed until February 9th. Police warn against misusing emergency services.
Web Summary : बीड के एक युवक ने 'डायल 112' पर झूठी डकैती की कॉल कर पुलिस को परेशान किया। उसके अहंकार और धमकियों से नाराज़ होकर पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया। अब वह 9 फरवरी तक जेल में है। पुलिस ने आपातकालीन सेवाओं का दुरुपयोग न करने की चेतावनी दी है।