शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
3
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
4
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
5
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
6
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
7
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
8
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
9
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
10
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
11
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
12
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
13
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
14
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
15
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
16
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
17
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
18
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
19
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
20
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी

गुन्हा काय दाखल करता? थेट माझे एन्काउंटर करून केस बंद करा; ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 11:54 IST

Beed Crime: महादेव मुंडे खून प्रकरण : ज्ञानेश्वरी मुंडे पोलिसांवर संतापल्या; मुख्यमंत्र्यांना भेटणार

बीड : परळी येथील मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हे समजताच त्या पोलिसांवर संतापल्या. माझ्यावर १०० गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही. पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याऐवजी माझे एन्काउंटर करावे, म्हणजे महादेव मुंडेची केस बंद होईल, संतप्त प्रतिक्रिया माध्यमांना शुक्रवारी दिली.

महादेव मुंडे खून प्रकरणाला २० महिने उलटले आहेत. तरीही बीड पोलिसांना अद्याप आरोपी कोण, हे समजले नाही. त्यामुळेच संतापलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा देत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली होती. भेटून परतताना ज्ञानेश्वरी यांनी विषारी द्रव प्राशन केले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

काय म्हणाल्या ज्ञानेश्वरी मुंडेआतापर्यंत पोलिस अधीक्षकांची चार वेळा भेट घेतली. त्यांच्याकडून प्रयत्न करतो, असे अश्वासन दिले जात होते. परंतु वारंवार तोच शब्द दिल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी मला न्याय देण्याऐवजी माझ्यावरच गुन्हा दाखल केला आहे. पीडितांवर हा अन्याय आहे. पण, कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही. आणखी महिनाभर थांबून पुन्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहन करणार, असा इशारा ज्ञानेश्वरी यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मागितली आहे. तीन दिवसांत आपण त्यांना भेटणार आहोत. त्यांनी किमान १० मिनिटे तरी वेळ द्यावा. त्यासाठी त्यांच्या बंगल्यावर जाऊ, असेही त्यांनी सांगितले.

यंत्रणेचा खर्च होणार वसूलज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासाठी पोलिस, आरोग्य, अग्निशमन, महसूल असे विविध विभाग पोलिस अधीक्षक कार्यालयात १७ जुलै रोजी तैनात होते. त्यांचे समाधान केल्यानंतरही त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. एवढेच नव्हे तर या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या सर्व यंत्रणेचा खर्चही त्यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. पोलिसांकडून तशी तजवीज ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.

युट्यूबवर पाहून बनविले विषारी द्रवज्ञानेश्वरी मुंडे यांच्या कुटुंबाने आणलेल्या पेट्रोलच्या बाटल्या पोलिसांनी गेटच्या बाहेरच काढल्या. परंतु परत जाताना ज्ञानेश्वरी यांनी एका छोट्या बाटलीत विषारी द्रव आणून ते प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यात उंदीर मारण्याचे विष होते. पावडर आणि पाणी मिसळून ते एका छोट्या बाटलीत ज्ञानेश्वरी यांनी आणले. हे त्यांनी यूट्यूबवर पाहिले होते. संयम सुटल्यानंतर त्यांनी ते प्राशन करण्याचा प्रयत्न केला, असा दावा ज्ञानेश्वरी यांचे बंधू सतीश फड यांनी केला आहे.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडPoliceपोलिस