शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Beed Crime: कोयत्याचा धाक दाखवत ऊसतोड मजुराच्या चिमुकलीवर ट्रॅक्टर चालकाचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:54 IST

ऊसतोड टोळीतीलच नराधमाने ओलांडली सीमा, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

- मधुकर सिरसटकेज (बीड): पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो किलोमीटरवरून ऊसतोडणीसाठी आलेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परभणी जिल्ह्यातून केज तालुक्यात कामासाठी आलेल्या एका ऊसतोड मजुराच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच टोळीतील नराधम ट्रॅक्टर चालकाने कोयत्याचा धाक दाखवून दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

भरदिवसा कोयत्याच्या जोरावर कृत्यमिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज अशोक खरात (रा. जामरून, ता. जिंतूर, जि. परभणी) हा त्याच टोळीत ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. १४ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास सुर्डी शिवारातील एका कोपीत मुलीला एकटे गाठून त्याने कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा हादगाव शिवारात त्याने पीडितेवर बळजबरी केली. जिवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या चिमुकलीने अखेर आपल्या आईला हा थरार सांगितला.

आरोपी ट्रॅक्टर सोडून पसार पीडितेच्या आईने हिंमत दाखवत मंगळवारी रात्री उशिरा युसूफवडगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नराधम सूरज खरात आपला ट्रॅक्टर हादगाव शिवारात सोडून फरार झाला आहे. सध्या 'पिंक पथका'चे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरवली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Tractor driver assaults minor sugarcane worker, threatens with sickle.

Web Summary : In Beed, a tractor driver sexually assaulted a 13-year-old sugarcane worker, threatening her with a sickle. The accused is absconding after the victim's mother filed a police complaint. Police are investigating the case under the POCSO Act.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याSexual abuseलैंगिक शोषण