- नितीन कांबळेकडा: पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, सांगलीसह अनेक जिल्ह्यात घरफोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला अट्टल गुन्हेगार चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत जागा बदलून राहत होता.आष्टी पोलिसांनी मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान ठाणे हद्दीतील एका वस्तीवर सापळा रचून झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या.सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले रा.बेलगाव ता.कर्जत जि.अहिल्यानगर असे त्याचे नाव आहे.आष्टी पोलिसांच्या कामगिरीचे पोलिस अधीक्षकांकडून कौतुक होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले याच्यावर बीड,पुणे,सोलापूर, अहिल्यानगर, सांगली,आष्टी यासह अनेक ठिकाणी घोरफोड्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत.चार वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत वास्तव बदलून राहत होता.आष्टी पोलिस देखील त्याच्या मागावर होतो.मंगळवारी रात्री तो आष्टी ठाणे हद्दीतील आंधळेवाडी येथील पारधीवस्तीवर आल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी फौजफाट्यासह सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.
ही कामगिरी आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे,पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद, विकास जाधव, अशोक तांबे,बब्रुवाण वाणी,नागेश लोमटे,संतोष दराडे,सजगणे,होमगार्ड यांनी केली.
गुन्ह्य़ांची हॅटट्रिक तरीही देत होता गुंगाराअट्टल दरोडेखोर 'आटल्या' भोसले याचा 'लाल्या' हा मोठा भाऊ असून घरफोडीसह लहानमोठे विविध पोलिस ठाण्यात त्यांच्यावर जवळपास १०० गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे.त्याला पकडल्याने आष्टी पोलिसांचे आता कौतुक होत असून पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी आष्टी पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.
क्षीरसागर, सय्यद जोडगोळीचे मोठे यशआष्टी पोलिस ठाणे हद्दीतील पाहिजे,फरारी व इतर घटनेतील आरोपीचा छडा लावून त्यांना पकडण्यात ठाण्यातील पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर व अंमलदार मजरूद्दीन सय्यद या जोडगोळीचे मोठे यश असून यासाठी आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे,पोलिस निरीक्षक शरद भुतेकर याचे मार्गदर्शन लाभत आहे.
'सोन्या' पाठोपाठ 'लाल्या' गळलाठाणे हद्दीत दोन ठिकाढी सशस्त्र दरोडा घालणारा मुख्य दरोडेखोर सोन्या चव्हाण च्या आठ दिवसापुर्वी मुसक्या आवळल्या होत्या.आता त्या पाठोपाठ अट्टल गुन्हेगार 'लाल्या'भोसलेच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.