शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
3
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
5
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
6
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
7
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
8
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
9
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
10
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
11
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
12
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
13
वाहन चालकांनो, ‘आरटीओ’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
14
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
15
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
16
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
17
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
18
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
19
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
20
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

Beed Crime: बापरे! चक्क हद्दपार आरोपीने पाेलिस ठाण्याच्या आवारातूनच चोरला ट्रॅक्टर

By सोमनाथ खताळ | Updated: December 4, 2025 11:43 IST

शिरूर कासारमधील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; आरोपी १३ मार्च २०२५ पासून हद्दपार असूनही जिल्ह्यात सक्रिय

बीड : पोलिस ठाण्याच्या आवारात जप्त करून ठेवलेला वाळूने भरलेला ट्रॅक्टर थेट हद्दपार केलेल्या आरोपीने चोरून नेल्याची अत्यंत धक्कादायक घटना शिरूर कासार येथे उघडकीस आली आहे. हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने आरोपीला ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले असले तरी, या घटनेमुळे पोलिसांच्या कारभारावर आणि गुन्हेगारांवरील वचकवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, याच पोलिस ठाण्यात मागील आठवड्यात एका पीडितेच्या आईला मदत न केल्याचा प्रकारही घडला होता.

१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, हद्दपार केलेला आरोपी दीपक आनंदा तळेकर (वय ३७, रा. फुलसांगवी, ता. शिरूर कासार) हा जुन्या शिरूर कासार पोलिस ठाण्याच्या आवारातून जप्त केलेला ट्रॅक्टर घेऊन जात होता. याची माहिती पोलिसांना मिळताच, त्याला सिद्धेश्वर चौकात ताब्यात घेण्यात आले. त्याने हा ट्रॅक्टर चौघांच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात सहायक फौजदार राम यादव यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी सध्या पोलिस कोठडीत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेबाबत बाजू समजून घेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी कॉल न घेतल्याने त्यांची बाजू समजली नाही. पोलिस ठाण्यात एकाच आठवड्यात घडलेल्या या दोन प्रकारांमुळे शिरूर कासार पोलिस ठाण्याच्या कारभारावर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हसर्वात गंभीर बाब म्हणजे, आरोपी दीपक तळेकर याला १३ मार्च २०२५ रोजी चकलांबा पोलिसांच्या प्रस्तावानंतर बीड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून एक वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपार केले होते. असे असतानाही तो केवळ जिल्ह्यात उपस्थित राहिला नाही, तर थेट पोलिस ठाण्याच्या आवारातील जप्त मुद्देमालाची चोरी करत असल्याने पोलिसांच्या वचकवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलिसांची प्रतिमा मलीनमागील काही दिवसांपासून बीड पोलिसांवरच आरोप होऊ लागले आहेत. यापूर्वी गेवराई ठाण्यातील कर्मचारी लाच घेताना पकडला. शिवाजीनगर ठाण्यातील सपोनि गजानन क्षीरसागर यांच्यावर सराफा व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये घेतल्याचा आरोप झाला. त्यानंतर निवडणुकीतही राडा झाल्याने पोलिसांची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे. त्यातच शिरूरमधील प्रकाराने आणखीनच भर टाकली आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Outrageous! Deported Criminal Steals Tractor from Police Station Premises in Beed

Web Summary : In Shirur Kasar, a deported criminal audaciously stole a tractor seized by police from the station's yard. The accused was arrested with the tractor. This incident raises serious questions about police oversight. Prior incident of negligence adds to public discontent.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या