शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बीड हादरले! विवस्त्र करून महिलेचा गळा आवळला; चोराने बांधून ठेवल्याचा दावा करणारा पती ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 12:57 IST

चोराने आपल्याला बांधून ठेवले असा दावा करणाऱ्या पतीवरच संशय असून त्याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू आहे.

बीड: तालुक्यातील रंजेगाव येथे एका विवाहित महिलेला विवस्त्र करून गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना ५ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली आहे. दरम्यान, चोराने आपल्याला बांधून ठेवले असा दावा करणाऱ्या पतीवरच संशय असून त्याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू आहे. या  धक्कादायक घटनेने बीड तालुक्यात खळबळ उडालीये.

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती दिनेश आबुज(२९) असे मयत महिलेचे नाव आहे. ज्योतीचे माहेर (सिंदफणा चिंचोली ता. गेवराई)  असून १२ वर्षांपूर्वी तिचा विवाह दिनेश उर्फ विश्वांभर पांडुरंग आबुज (३५, रा. रंजेगाव) याच्याशी झाला होता. दिनेश शेती करतो तर ज्योती घरकाम करते. दिनेशचे आई- वडील चार धाम यात्रेसाठी गेले होते. घरी ज्योती, दिनेश व त्यांची दोन मुले होती.

५ जून रोजी पहाटे दोरीने गळा आवळून ज्योतीचा खून करण्यात आला. पहाटे पतीने चार ते पाच चोरांनी घरात घुसून मारहाण करत पत्नीला विवस्त्र केले तर आपल्याला बाहेर दरवाजाजवळ बांधून टाकून नंतर पत्नीला संपविले, असा खुलासा केला. दरम्यान, घटनास्थळी उपअधीक्षक संतोष वाळके, पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक उपनिरीक्षक एम. एन. ढाकणे तसेच गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. खुनाचे गूढ कायम असून तपास यंत्रणा जोमाने कामाला लागल्या आहेत. महिलेचा गळा आवळून खून झाला हे स्पष्ट आहे. संशयित पतीची चौकशी केली जात आहे. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली.पतीने बनाव केल्याचा आरोपमयत ज्योतीचा भाऊ केदार पांडुरंग करांडे याने पती दिनेशवर आरोप केला आहे. तो तिला सतत मानसिक व शारीरिक त्रास देत असे.तिला संपवून घरात चोर शिरले होते व त्यांनी तिला मारून मला बांधून टाकले असा बनाव केला असल्याचा आरोप त्याने केला. ज्योतीच्या गळ्यातील दागिने सुरक्षित आहेत, घरातील सर्व ऐवज जशास तसा आहे.त्यामुळे चोर हे कृत्य कसे करू शकतात यावर विश्वास नाही, असे त्याने सांगितले. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू